हेल्थ इज वेल्थ !

By Admin | Updated: April 7, 2015 01:24 IST2015-04-07T00:31:40+5:302015-04-07T01:24:40+5:30

संजय तिपाले / व्यंकटेश वैष्णव, बीड स्लीम बॉडी, जीमचे आकर्षण चाळीशी ओलांडलेल्यांना आजही आहे. ७० टक्के नागरिक सदृढ आरोग्यासाठी ‘मॉर्निंग वॉक’ करतात. जमाना ‘स्पेशलायझेशन’चा आहे

Health Is Wealth! | हेल्थ इज वेल्थ !

हेल्थ इज वेल्थ !


संजय तिपाले / व्यंकटेश वैष्णव, बीड
स्लीम बॉडी, जीमचे आकर्षण चाळीशी ओलांडलेल्यांना आजही आहे. ७० टक्के नागरिक सदृढ आरोग्यासाठी ‘मॉर्निंग वॉक’ करतात. जमाना ‘स्पेशलायझेशन’चा आहे. त्यामुळे उपचार घेतानाही तज्ज्ञांकडे जाण्याचे प्रमाण ६० टक्के आहे. पूर्वी अंगावर दुखणे काढले जायचे;पण आता आरोग्याबाबत सामान्यांत जागरुकता आली आहे. ‘हेल्थ इज वेल्थ’ हा मंत्र धावपळीच्या युगातही जपला जात आहे.
‘लोकमत’ने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून सोमवारी ‘आरोग्याबाबतची काळजी’ या विषयावर सर्वेक्षण केले. यातून हा निष्कर्ष पुढे आला. ७ प्रश्न बंदिस्त होते तर एक खुला होता. १८ ते ६० वर्षे वयोगटातील महिला- पुरुषांकडून ही प्रश्नावली भरुन घेतली.
आजारी पडण्याची चाहूल लागली तरी अनेकजण दवाखाना गाठतात. पॅथींच्या बाबतीत मात्र होमिओपॅथीला प्राधान्य आहे. युनानी उपचार घेणारे केवळ १० टक्के रूग्ण आहेत. डॉक्टरांनी सांगितलेले पथ्य पाळून आरोग्य ठणठणीत रहावे, यासाठी अनेक जण प्रयत्नशील असतात.
दवाखान्यातील उपकरणे घरी
वारंवार दवाखान्यात जाण्याऐवजी घरीच उपचार घेता यावेत यासाठी विविध साहित्य, उपकरणे खरेदी करून ठेवले आहेत. लहान मुलांच्या आरोग्याबाबत पालक जागरूक असून आरोग्य पेटी कायम भरलेली असते.

Web Title: Health Is Wealth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.