Marathi Jokes: ...अन् गण्या चक्क गाढवाला घेऊन शाळेत गेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 19:11 IST2020-11-25T19:11:08+5:302020-11-25T19:11:24+5:30
Marathi Jokes: गण्याच्या उत्तरामुळे शिक्षिका निरुत्तर

Marathi Jokes: ...अन् गण्या चक्क गाढवाला घेऊन शाळेत गेला
गण्या गाढवाला घेऊन शाळेत गेला.
शिक्षिका- या गाढवाला इथे का आणलंय..?
गण्या- तुम्हीच काल म्हणत होता ना मी मोठ्या मोठ्या गाढवांना माणसात आणलंय.. त्यांना शिकवलंय..
शिक्षिका- मग...?
गण्या- म्हणूनच याला शाळेत घेऊन आलो.. तुमच्यामुळे याच्याही आयुष्याचं भलं व्हावं हा विचार करून याला आणलंय..