stingy husbands last message while she was about to die marathi jokes | Marathi Jokes: कंजूषपणाची हद्द झाली राव! प्रकृती गंभीर असलेल्या बायकोला नवरा म्हणाला...

Marathi Jokes: कंजूषपणाची हद्द झाली राव! प्रकृती गंभीर असलेल्या बायकोला नवरा म्हणाला...

एका व्यक्तीची पत्नी अतिशय आजारी होती.. ती देवाघरी जाईल असंच वाटत होतं..

तिच्यावर उपचार होणं गरजेचं होतं.. पण तिचा नवरा महाकंजूष... तो काही तिला रुग्णालयात नेईना...

अखेर बायकोची तळमळ पाहून नवऱ्यानं डॉक्टरला घरी आणण्याचं ठरवलं.. तितक्यात लाईट गेली..

नवऱ्यानं लगेच मेणबत्ती लावली.. बायको कधीही जाईल अशी स्थिती.. घरातून निघताना तो तिला म्हणाला....

''डॉक्टरला आणायला जातोय.. जर तुला वाटलंच की आता तू वाचणार नाहीस, तर शेजारी लावलेली मेणबत्ती विझवून टाक..''
 

Web Title: stingy husbands last message while she was about to die marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.