Marathi Jokes: ...म्हणून 'त्या' महाकंजूष बापानं पोटच्या पोराला बदडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 12:13 IST2020-11-26T12:09:47+5:302020-11-26T12:13:13+5:30
Marathi Jokes: महाकंजूष माणसानं पोराला धोपटलं

Marathi Jokes: ...म्हणून 'त्या' महाकंजूष बापानं पोटच्या पोराला बदडलं
एक महाकंजूष माणूस त्याच्या मुलाला बदडत होता..
शेजारी- अहो काय झालं...? कशाला मारताय त्या बिचाऱ्या मुलाला...?
कंजूष- हा आणि बिचारा..? एक नंबरचा बावळट आणि मूर्ख आहे...
शेजारी- अहो पण झालं तरी काय..?
कंजूष- मी याला सांगितलं होतं, जिना चढताना एक-एक पायरी सोडत जा.. चप्पल कमी झिजेल..
शेजारी- मग...?
कंजूष- अहो, हा २-२ पायऱ्या सोडून जिने चढला..
शेजारी- अहो, मग चांगलंय की.. चप्पल कमी झिजेल ना..?
कंजूष- कसलं काय..? अहो पँट फाटली त्याची.. उगाच खर्च वाढला ना आता..