Marathi Jokes: ...तर फायद्यात राहाल; आई आणि बायकोच्या भांडणात सँडविच होणाऱ्या नवऱ्यांसाठी स्पेशल टिप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 15:53 IST2021-01-08T15:52:53+5:302021-01-08T15:53:09+5:30
Marathi Jokes: आई आणि बायकोच्या भांडणात स्वत:ला सुरक्षित कसं ठेवाल?

Marathi Jokes: ...तर फायद्यात राहाल; आई आणि बायकोच्या भांडणात सँडविच होणाऱ्या नवऱ्यांसाठी स्पेशल टिप
सासू-सुनेचं भांडण झालं की नवऱ्याचं सँडविच होतं.. कोणाचीही बाजू घेतली तरी ऐकावं लागतंच... आईची बाजू घेतली की बायको रागवणार आणि बायकोची बाजू घेतली की 'बायकोच्या ताटाखालचं मांजर', 'बायकोचा बैल' असं आई ऐकवणार..
आई आणि बायकोच्या भांडणातून सुरक्षित बचाव करायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा.. आईसमोर बायकोला ओरडत असतेवेळीच तिला डोळा मारा...
डोळा मारण्याची वेळ योग्य असायला हवी.. म्हणजे नंतर बायकोची समजूत घालण्यात वेळ आणि कष्ट वाया जात नाहीत..
पण डोळा योग्य वेळीच मारा.. अन्यथा तुमच्यावर वाईट वेळ येईल...