Marathi Jokes: उधारी न फेडणाऱ्या ग्राहकाला दुकानदारानं लग्नात दिला 'खास' अहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 15:48 IST2021-02-17T15:47:55+5:302021-02-17T15:48:12+5:30
Marathi Jokes: दुकानदार रॉक्स; ग्राहक शॉक्स

Marathi Jokes: उधारी न फेडणाऱ्या ग्राहकाला दुकानदारानं लग्नात दिला 'खास' अहेर
एक दुकानदार आपल्या एका गिऱ्हाईकाच्या लग्नाला गेला..
रिसेप्शन सुरू झाल्यावर दुकानदारानं आपल्या ग्राहकाला अहेर दिला..
दुसऱ्या दिवशी ग्राहकानं अहेराची पाकिटं उघडली..
दुकानदाराचं नाव असलेल्या पाकिटात एक चिठ्ठी सापडली..
त्यात लिहिलं होतं- तुमची माझ्याकडे असलेली उधारी १८४६ रुपये.. माझ्याकडून तुम्हाला लग्नाचा अहेर ५०१ रुपये.. आता तुमची उधारी १३४५ रुपये.. लवकर फेडून टाका..