Marathi Jokes: उद्यापासून चपात्या बंद, फक्त भातच खाणार; घरजावयानं घोषणाच केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 18:00 IST2021-09-26T18:00:00+5:302021-09-26T18:00:03+5:30

Marathi Jokes: जावईबापू संतापले; घोषणा करून बसले

Marathi Jokes will only eat rice from tomorrow says in law | Marathi Jokes: उद्यापासून चपात्या बंद, फक्त भातच खाणार; घरजावयानं घोषणाच केली

Marathi Jokes: उद्यापासून चपात्या बंद, फक्त भातच खाणार; घरजावयानं घोषणाच केली

घरजावई- आजपासून मी फक्त भातच खाईन.. चपात्या बंद...

सासू- का हो..? काय झालं..? चपात्या चांगल्या नसतात का..?

घरजावई- चपात्यांचा प्रश्न नाही.. पण बंद म्हणजे बंद...

सासू- मग काय झालं..?

घरजावई- शेजाऱ्यांचे टोमणे ऐकून वैतागतोय..

सासू- कोण काय बोललं तुम्हाला..?

घरजावई- सगळेच शेजारी बोलतात, सासरवाडीत राहून तुकडे मोडतोय नुसता..
 

Web Title: Marathi Jokes will only eat rice from tomorrow says in law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.