Marathi Jokes: बायको बाहेर असताना तिची मैत्रीण आली घरी, खुशीत होती नवरोबांची स्वारी; पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 08:00 IST2021-05-08T08:00:00+5:302021-05-08T08:00:07+5:30
Marathi Jokes: बायकोच्या मैत्रिणीशी नवऱ्याच्या मस्त गप्पा रंगल्या; छान ओळख झाली

Marathi Jokes: बायको बाहेर असताना तिची मैत्रीण आली घरी, खुशीत होती नवरोबांची स्वारी; पण...
बायको शेजारी गेली असताना तिची मैत्रीण घरी आली.. बायकोच्या मैत्रिणीला पाहून नवरा खुशीत होता...
नवऱ्यानं लगेच तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली.. एक एक करून विषय निघाले आणि मस्त गप्पा रंगल्या...
तितक्यात बायको आली.. नवऱ्याचा चेहरा पडला... त्याला गप्पा मारायच्या होत्या.. शेवटी त्यानं शक्कल लढवली..
नवरा- अगं जरा स्वयंपाकघरात जातेस का..? डाळ ठेवलीय शिजत...
बायको- डाळ करपली तरी चालेल.. पण मी तुमची डाळ शिजू देणार नाही...