Marathi Jokes: बायको साडी खरेदी करायला गेली; दुकानात भलताच पराक्रम करून आली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 08:00 IST2021-11-10T08:00:00+5:302021-11-10T08:00:02+5:30
Marathi Jokes: साडी खरेदी करायला गेलेल्या बायकोचा भलताच पराक्रम

Marathi Jokes: बायको साडी खरेदी करायला गेली; दुकानात भलताच पराक्रम करून आली
एका माणसाची बायको साडी खरेदीसाठी दुकानात गेली.. तब्बल चार तास दुकानातील कर्मचारी तिला साड्या दाखवत होते..
कांजीवरम, बनारसी, पैठणी, नऊवारी, बांधणी अशा विविध साड्या पाहून झाल्या.. कर्मचाऱ्यांनी बॉक्स उघडून अनेक साड्या दाखवल्या..
महिला- तुमच्याकडे फारच कमी व्हेराएटी आहेत...
दुकानदार- अहो मॅडम, शंभर, दोनशे साड्या पाहिल्या तुम्ही..
महिला- पण नाही ना आवडल्या.. तुमच्या मागे तो बॉक्स आहे.. तो दाखवा ना.. ती साडी आवडते का बघते..
दुकानदार- त्यात दुकानाची कागदपत्रं आहेत मॅडम.. या आता तुम्ही...