Marathi Jokes: हट्टाला पेटलेल्या बायकोने घर डोक्यावर घेतले; संकटसमयी नवऱ्याचे 'बॉस' मदतीला धावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 15:26 IST2021-05-15T15:25:58+5:302021-05-15T15:26:11+5:30
Marathi Jokes: बायको हट्ट करत असल्यानं सुट्टी मागण्यासाठी नवरा बॉसकडे गेला

Marathi Jokes: हट्टाला पेटलेल्या बायकोने घर डोक्यावर घेतले; संकटसमयी नवऱ्याचे 'बॉस' मदतीला धावले
बाळू- सर, मला सुट्टी हवीय..?
बॉस- कशासाठी?
बाळू- बायको हट्टाला पेटलीय.. तिने घर डोक्यावर घेतलंय.. फिरायला न्या म्हणते.. म्हणून सुट्टी हवीय..
बॉस- किती दिवस हवीय सुट्टी..?
बाळू- तसं तर ती १५ दिवस म्हणालीय.. पण १०-१२ दिवस दिलीत तरी मला चालेल...
बॉस- ऑफिसमध्ये खूप कामं आहेत.. सुट्टी मिळणार नाही..
बाळू- धन्यवाद सर.. मला माहितीच होतं, संकट काळात तुम्हीच माझ्या कामी याल.. खूप खूप आभारी आहे तुमचा...