Marathi Jokes: आमचे अहो म्हणजे 'केबीसी'तील अमिताभ बच्चन; भन्नाट तुलनेनं नातेवाईकांना हसू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 08:00 IST2021-07-15T08:00:00+5:302021-07-15T08:00:02+5:30
Marathi Jokes: नवऱ्याची तुलना थेट केबीसीतल्या अमिताभ बच्चन यांच्याशी

Marathi Jokes: आमचे अहो म्हणजे 'केबीसी'तील अमिताभ बच्चन; भन्नाट तुलनेनं नातेवाईकांना हसू अनावर
एक महिला लग्नात तिच्या नवऱ्याबद्दल सांगत होती..
महिला- माझे हे अमिताभ बच्चनपेक्षा कमी नाहीत बरं..
नातेवाईक- भारदस्त आवाज आहे का त्यांचा..?
महिला- नाही हो... कौन बनेगा करोडपतीमधले अमिताभ बच्चन..
नातेवाईक- म्हणजे चार पर्याय देतात की प्रश्न विचारतात खूप..?
महिला- नाही हो... जरा पैसा मागितले की एकच प्रश्न विचारतात..
नातेवाईक- कोणता..?
महिला- इतक्या पैशांचं तुम्ही काय करणार...?