Marathi Jokes: बायको पहिल्यांदाच भाजी घ्यायला गेली अन् नवऱ्याच्या इज्जतीचा भाजीपाला करून आली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 08:00 IST2021-07-07T08:00:00+5:302021-07-07T08:00:02+5:30
Marathi Jokes: बायकोनं एक घोडचूक केली आणि भाजीवाल्यानं बरोबर ओळखलं

Marathi Jokes: बायको पहिल्यांदाच भाजी घ्यायला गेली अन् नवऱ्याच्या इज्जतीचा भाजीपाला करून आली
एक नवविवाहित जोडपं भाजी घेत होतं... जवळपास चार दिवस पुरेल इतका भाजीपाला घेतला..
बायको सर्व भाजीपाला पिशवीत भरत होती.. भाजी विक्रेता त्याच्या हालचाली पाहत होता..
भाजीवाला- मॅडम, इंग्लिश मीडियममध्ये शिकलेल्या दिसताहेत...
नवरा (चकित होऊन)- हो दादा... पण तुम्हाला कसं कळलं...?
भाजीवाला- त्यांनी पिशवीत टोमॅटो आधी भरले आणि त्यावर भोपळा ठेऊ लागल्या, त्याच्यावरून कळलं..
भाजीवाल्यासमोर बायकोनं इज्जतीचा भाजीपाला केल्याचे भाव नवऱ्याच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होते..