Marathi Jokes: ...तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती लाभेल! प्रकृती बिघडलेल्या बायकोची शेवटची इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 08:00 IST2021-05-03T08:00:00+5:302021-05-03T08:00:07+5:30
Marathi Jokes: यालाच म्हणतात जिंदगी साथ भी और जिंदगी के बाद भी...

Marathi Jokes: ...तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती लाभेल! प्रकृती बिघडलेल्या बायकोची शेवटची इच्छा
बायकोची प्रकृती बिघडत होती.. आपल्याला देवाज्ञा झाली तर, या विचारानं ती खिन्न होती..
मरण्याआधी आपलं सुंदर पेंटिंग असावं अशी तिची इच्छा.. त्यामुळे तिनं एका चित्रकाराला बोलावलं...
चित्रकार घरी आला.. त्याचं चित्र जवळपास पूर्ण झालं होतं.. तितक्यात महिलेनं त्याला थांबवलं..
महिला- एका काम कर... माझ्या गळ्यात एखादा उंची, महागडा हार दाखव चित्रात...
चित्रकारानं गळ्यात तसा हार दाखवला.. चित्र पूर्ण झाल्यानंतर चित्रकारानं त्याबद्दल विचारणा केली...
महिला म्हणाली- एखाद्या वेळेस माझं निधन झालं तर माझा नवरा दुसरं लग्न करेल...
त्याची दुसरी बायको आल्यावर ती हार शोधेल... तिला तो मिळणार नाही.. मग त्या दोघांचं भांडण होईल...
त्यांचं भांडण झाल्यावर माझ्या आत्म्याला शांती लाभेल...
यालाच म्हणतात जिंदगी साथ भी और जिंदगी के बाद भी...