Marathi Jokes: नवऱ्याची ऑफिस बिल्डिंग कोसळली; बातम्या पाहून बायको प्रचंड वैतागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 08:00 IST2021-06-28T08:00:00+5:302021-06-28T08:00:02+5:30

Marathi Jokes: ऑफिसची इमारत कोसळून सगळे जण दगावले; फक्त एक जण वाचला

Marathi Jokes wife angry over husband after he safely comes home after his office building collapse | Marathi Jokes: नवऱ्याची ऑफिस बिल्डिंग कोसळली; बातम्या पाहून बायको प्रचंड वैतागली

Marathi Jokes: नवऱ्याची ऑफिस बिल्डिंग कोसळली; बातम्या पाहून बायको प्रचंड वैतागली

नवरा अतिशय हताश स्थितीत संध्याकाळी कामावरून परतला...

बायको- काय झालं हो..?

नवरा- आज आमच्या ऑफिसची इमारत कोसळली.. सगळे कर्मचारी दगावले...

बायको- अरे देवा... मग तुम्ही कसे वाचलात..?

नवरा- मी सिगारेट ओढायला खाली गेलो होतो...

बायको- चला, देवाचे उपकारच झाले म्हणायचे...

थोड्या वेळानं बायकोनं टीव्ही लावला... अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला सरकारनं १-१ कोटी रुपये देण्याची घोषणा केल्याचं न्यूज चॅनेलवर दाखवत होते...

बातम्या पाहून बायको वैतागली...

बायको- तुमची ही सिगारेट ओढण्याची सवय कधी जाणार देव जाणे...

Web Title: Marathi Jokes wife angry over husband after he safely comes home after his office building collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.