रमेश, सुरेश आणि गणेश... तीन मित्रांची लग्नावर चर्चा सुरू होती.. रमेशचं लग्न झालेलं, त्याचा संसार तसा बरा चाललेला... तर सुरेश लग्न करून वैतागलेला....
आता गणेशच्या लग्नाचा विषय सुरू होता...
रमेश- अरे, कर रे लग्न... छान अनुभव असतो...
सुरेश- काही नको रे.. कटकट असते नुसती...
गणेश- अरे बाबांनो.. एक काय ते सांगा ना...
रमेश- अरे कसं असतं गण्या.. विवाहित पुरुषाचं आयुष्य काश्मीरसारखं असतं... तसं पाहायला सुंदर दिसतं.. पण दहशत कायम असते...