Marathi Jokes: डेट आणि तारीख यात फरक काय?; नवऱ्याचं बायकोला भन्नाट कोडं, उत्तरही सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 08:04 IST2022-01-25T08:04:37+5:302022-01-25T08:04:55+5:30
Marathi Jokes: नवऱ्याच्या गुगलीवर बायकोची विकेट

Marathi Jokes: डेट आणि तारीख यात फरक काय?; नवऱ्याचं बायकोला भन्नाट कोडं, उत्तरही सांगितलं
नवरा- तुला एक प्रश्न विचारू का..? म्हणजे कोडं आहे साधं..
बायको- विचारा की...
नवरा- डेट आणि तारीख यात काय फरक आहे..?
बायको- दोन्हीच अर्थ तसे सारखेच होतात.. दोन्हीचा अर्थ एकच...
नवरा- मी सांगू का उत्तर..?
बायको- सांगा सांगा..
नवरा- डेटवर बांद्रा, कुलाबा, मरीन लाईन्स, लोखंडवालाची मुलं जातात.. आणि तारखेला काळाचौकी, दादर, नायगाव, भायखळा, आर्थर रोड, लालबाग, परळ, वरळी, प्रभादेवी, ताडदेव, भांडुपची पोरं जातात...
बायकोची विकेट...