Marathi Jokes: सासू नदीत बुडताना जावयाला झाला साक्षात्कार अन् पुढे घडला चमत्कार; वाचा धम्माल किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 10:43 IST2021-07-21T10:33:19+5:302021-07-21T10:43:41+5:30
Marathi Jokes: अजब प्रकार! सासू नदीत बुडून गेल्यावर जावयाच्या दारात उभी राहिली महागडी लक्झरी कार

Marathi Jokes: सासू नदीत बुडताना जावयाला झाला साक्षात्कार अन् पुढे घडला चमत्कार; वाचा धम्माल किस्सा
एका बाईला चार जावई होते... तिला त्यांची परीक्षा घ्यायची होती.. कोणता जावई माझी सर्वाधिक काळजी करतो हे तिला पाहायचं होतं...
एके दिवशी सासू पहिल्या जावयाला नदीच्या तिरावर घेऊन गेली.. तिनं अचानक नदीत उडी मारली.. जावई लगेच नदीत झेपावला...
थोरल्या जावयानं सासूला वाचवलं.. दुसऱ्या दिवशी त्याच्या घराबाहेर एक महागडी एसयूव्ही उभी होती.. सासूकडून गिफ्ट...
त्यानंतर एके दिवशी सासू दुसऱ्या जावयाला घेऊन नदी किनारी गेली.. पुन्हा उडी मारली.. दुसऱ्या जावयानं जिवावर होऊन सासूला वाचवलं..
पुढच्याच दिवशी त्याच्या घराबाहेर एक महागडी मोटारसायकल उभी... सासूकडून गिफ्ट...
त्यानंतर सासू तिसऱ्या जावयाला घेऊन नदी पात्रात गेली.. पुन्हा तोच प्रकार घडला.. सासूची उडी अन् जावयाकडून तिला जीवदान..
पुढच्या दिवशी तिसऱ्या जावयाच्या घराबाहेर एक स्कूटर उभी होती... सासूकडून गिफ्ट...
या सगळ्या घटना चौथ्या जावयाला समजल्या.. सासू परीक्षा घेतेय आणि परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर जावयांना गिफ्ट देते, ही गोष्ट त्याच्या लक्षात आली..
एके दिवशी सासू चौथ्या जावयाला घेऊन नदीवर गेली.. सासूनं उडी घेतली.. चौथा जावईदेखील उडी घेणार... तितक्यात...
तितक्यात त्याच्या डोळ्यासमोरून सगळ्या घटना गेल्या.. पहिल्याला महागडी एसयूव्ही.. दुसऱ्याला मोटारसायकल.. तिसऱ्याला स्कूटर...
हा उतरता क्रम पाहून आपल्याला सायकलच मिळेल, असा विचार त्याच्या मनात आला.. 'मरू दे ती सासू' असं म्हणत त्यानं उडी मारण्याचा विचार रद्द केला...
सासू देवाघरी गेली.. काही दिवस गेले... दहावं, तेरावं झालं... त्यानंतर एके दिवशी त्या चौथ्या जावयाच्या घराबाहेर तब्बल एक कोटीची लक्झरी कार उभी होती...
त्या कारवर एक चिठ्ठी होती.... सासू तर मेली.. मग कार कोणी दिली, असा विचार जावयाच्या मनात आला.. त्यानं ती चिठ्ठी धावत जाऊन उघडली..
त्यात लिहिलं होतं.. ''लाडक्या जावयाला सासऱ्याकडून गिफ्ट...''