Marathi Jokes: पुण्याला विद्येचे माहेरघर का म्हणतात..? माहित्येय का...?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 08:20 IST2021-06-22T08:19:51+5:302021-06-22T08:20:12+5:30
Marathi Jokes: गण्याच्या उत्तरानं गुरुजी अवाक्

Marathi Jokes: पुण्याला विद्येचे माहेरघर का म्हणतात..? माहित्येय का...?
वर्गात गुरुजी शिकवत असताना ते गण्याला विचारतात..
गुरुजी- गण्या, पुण्याचा आहेस तर सांग बरं, पुण्याला विद्येचे माहेरघर का म्हणतात?
गण्या- विद्याचा जन्म पुण्यात झाला, ती वयात आल्यावर तिच्यासाठी वर संशोधनाचे प्रयत्न सुरू झाले. "विद्या विनयेन शोभते" असं म्हणतात. पण पुणेरांकडे काही विनय नाही. म्हणून मुंबईतल्या विनयशी तिचे लग्न लावून दिले. त्यामुळे तिला पुणे सोडून जावे लागले. तरीही तिचे माहेर पुण्यात असल्यानं, पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणतात!
यानंतर गुरुजींनी शाळा सोडली...