Marathi Jokes: रोनाल्डो भावा, आता आमच्यासाठी फक्त एकच कर; भारतीयांची भन्नाट विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 08:00 IST2021-06-21T08:00:00+5:302021-06-21T08:00:05+5:30
Marathi Jokes: आता चक्क रोनाल्डोला मदतीसाठी साकडं

Marathi Jokes: रोनाल्डो भावा, आता आमच्यासाठी फक्त एकच कर; भारतीयांची भन्नाट विनंती
फुटबॉलपटू रोनाल्डोनं पत्रकार परिषद सुरू असताना समोरच्या टेबलवरील कोकाकोलाच्या दोन बाटल्या हटवल्या...
दुसऱ्याच दिवशी कोकाकोलाचे शेअर्स गडगडले... कोट्यवधींचं नुकसान झालं...
त्यानंतर आता भारतातील समस्त जनता एकच मागणी करतेय..
रोनाल्डो भावा,आमच्यासाठी फक्त एक गोष्ट कर...
पुढल्या वेळी पेट्रोल, डिझेलच्या बाटल्या टेबलावरून उचलून बाजूला ठेव...
प्रयत्न तर करून बघ लेका.. उतरले भाव तर उतरले...
लई पुण्य पडेल बघ गड्या तुझ्या पदरात...