Marathi Jokes: डॉक्टरांनी लिहून दिलेलं औषध कुठेच मिळेना; रुग्णानं डॉक्टरांना नाव विचारताच मिळालं भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 08:00 IST2021-07-22T08:00:00+5:302021-07-22T08:00:02+5:30
Marathi Jokes: डॉक्टरांचं उत्तर ऐकून रुग्णानं कपाळावर हात मारून घेतला

Marathi Jokes: डॉक्टरांनी लिहून दिलेलं औषध कुठेच मिळेना; रुग्णानं डॉक्टरांना नाव विचारताच मिळालं भन्नाट उत्तर
डॉक्टरांनी एका रुग्णाला तपासून प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं... रुग्ण औषधं खरेदी करण्यासाठी मेडिकलमध्ये गेला..
एक औषध सोडून त्याला इतर सगळी औषधं मिळाली... बरीच मेडिकल फिरला.. पण प्रिस्क्रिप्शनमधलं शेवटचं औषध मिळेना..
मेडिकल फिरून फिरून रुग्ण थकला... त्यानं दवाखाना गाठला...
रुग्ण- अहो, डॉक्टर हे शेवटी काय लिहिलंय तुम्ही..? कोणतं औषध आहे हे..? मिळतच नाहीए...
डॉक्टर- अहो ते औषधाचं नाव नाहीए.. माझं पेन चालत नव्हतं.. ते चेक करत होतो...