Marathi Jokes: हॅलो, ऐका ना, मी बोलतेय! मध्यरात्री मधाळ आवाजात नवऱ्याला शेजारणीचा कॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 18:00 IST2021-09-22T18:00:00+5:302021-09-22T18:00:03+5:30

Marathi Jokes: नवऱ्याला जेव्हा मध्यरात्री शेजारणीचा कॉल येतो....

Marathi Jokes neighbor dials man who was not receiving his wifes call | Marathi Jokes: हॅलो, ऐका ना, मी बोलतेय! मध्यरात्री मधाळ आवाजात नवऱ्याला शेजारणीचा कॉल

Marathi Jokes: हॅलो, ऐका ना, मी बोलतेय! मध्यरात्री मधाळ आवाजात नवऱ्याला शेजारणीचा कॉल

नवरा-बायकोमध्ये सकाळी प्रचंड भांडण झालं.. नवरा ऑफिसला गेला.. रात्री उशिरापर्यंत तो परत आला नाही...

बायको सतत फोन करत होती.. पण नवरा फोन उचलेना.. नवरा मित्राच्या घरी बसला होता...

बायकोला वैतागलेला नवरा घरी जाण्याच्या मनस्थितीत नव्हता.. त्यामुळे तो बायकोचे फोनच घेत नव्हता...

मध्यरात्री बायकोचे फोन थांबले... ३ वाजता शेजारणीचा कॉल आला... नवऱ्यानं लगेच उचलला...

शेजारीण- हॅलो, ऐका ना, मी बोलतेय... 

नवरा- हा बोल ना...

तितक्यात समोरून बायकोचा आवाज आला...

बायको- माझे शंभर कॉल उचलले नाहीत... तेव्हा धाड भरली का होती तुम्हाला..? आता हिच्या नंबरवरचा कॉल एका फटक्यात उचलला... या घरी.. बघतेच तुम्हाला.. नाही तंगडं तोडलं ना...

Web Title: Marathi Jokes neighbor dials man who was not receiving his wifes call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.