Marathi Jokes: मुलीकडच्यांनी कळवला नकार; मुलाच्या वडिलांनी ठोकला षटकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 08:00 IST2021-10-10T08:00:00+5:302021-10-10T08:00:06+5:30
Marathi Jokes: मुलाच्या वडिलांचं उत्तर ऐकून मुलीकडचे सगळे खो खो हसले

Marathi Jokes: मुलीकडच्यांनी कळवला नकार; मुलाच्या वडिलांनी ठोकला षटकार
मुलगी पाहण्याचा कार्यक्रम सुरू होता... दोन्ही कुटुंबांनी एकमेकांची विचारपूस केली...
दोन्ही कुटुंबात संवाद झाला.. मग मुलगा मुलीला बोलण्याची संधी दिली..
मुलाच्या तुलनेत मुलगी सरस होती.. त्यामुळे निघतानाच मुलीकडच्यांनी स्पष्टच सांगितलं...
मुलीचे वडील- नंतर कळवतो, मग सांगतो असं मी म्हणणार नाही.. उगाच तुम्हाला खोट्या आशेवर ठेवणार नाही... आम्हाला मुलगा आवडला नाही..
मुलाकडच्यांना याची कल्पना होती.. आपला मुलगा कसा आहे, ते त्यांना माहीत होतं...
मुलाचे वडील- अहो, तो तर आम्हाला पण आवडत नाही... मग आता काय घरातून हाकलून द्यायचं का..?