Marathi Jokes: पंचाहत्तरी ओलांडलेल्या आजोबांनी उलगडलं 'एव्हरग्रीन' प्रेमाचं रहस्य; आजीबाई उडाल्याच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 08:00 IST2022-01-06T08:00:00+5:302022-01-06T08:00:04+5:30
Marathi Jokes: ५० वर्षे सुखी संसार केलाय; आजोबा नॉर्मल वाटले काय तुम्हाला..?

Marathi Jokes: पंचाहत्तरी ओलांडलेल्या आजोबांनी उलगडलं 'एव्हरग्रीन' प्रेमाचं रहस्य; आजीबाई उडाल्याच
तब्बल ५० वर्षे सुखी संसार केलेल्या आजोबांची मुलाखत सुरू होती... मुलाखत अगदी रंगात आली होती...
मुलाखतकार- तुम्ही वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत.. ५० वर्षे सुखी संसार केलाय...
आजोबा- इश्वराची कृपा...
मुलाखतकार- वयाची पंचाहत्तरी ओलाडून गेली.. पण तुम्ही तुमच्या पत्नीला आजही डार्लिंगच म्हणतात... या एव्हरग्रीन प्रेमाचं रहस्य काय...?
आजोबा- त्याचं काय आहे... २० वर्षांपूर्वी मी हिचं नाव विसरलो आणि ते विचारण्याची माझी हिंमत झाली नाही...