Marathi Jokes: हातून 'ती' घोडचूक घडली अन् नवऱ्यानं बायकोसमोर दारू सोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 08:00 IST2021-09-07T08:00:00+5:302021-09-07T08:00:07+5:30

नवरा दारू ढोसून घरी आला आणि त्यानं दारू सोडण्याचा निर्णय घेतला

Marathi Jokes husband quit alcohol after making big mistake | Marathi Jokes: हातून 'ती' घोडचूक घडली अन् नवऱ्यानं बायकोसमोर दारू सोडली

Marathi Jokes: हातून 'ती' घोडचूक घडली अन् नवऱ्यानं बायकोसमोर दारू सोडली

नवरा दारू पिऊन घरी आला... त्याचा एकंदरीत अवतार पाहून बायकोला ते समजलं होतं...

बायको- आलात ना पुन्हा ढोसून..?

नवरा- दारू वाईट.. खूप वाईट...

बायको- तरी पिताच ना...?

नवरा- आजपासून सोडली... कारण आज मला साक्षात्कार झालाय दारू वाईट....

बायको- का हो..? आज काय झालंय..?

नवरा- येताना एटीएममध्ये गेलो होतो... दारूच्या नशेत काय करून बसलो मी हे...

बायको- काय केलंत..? फोडलंत की काय एटीएम..?

नवरा- नाही गं.. दोन हजार काढले.. चुकून नोट फाडली आणि एटीएमध्ये निघालेली पावती घडी करून खिशात ठेवली... 

Web Title: Marathi Jokes husband quit alcohol after making big mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.