Marathi Jokes: किर्तन सोडून नवरा अचानक निघाला घरी; तितक्यात आली बायकोची स्वारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 08:00 IST2022-02-07T08:00:00+5:302022-02-07T08:00:03+5:30
Marathi Jokes: बायको जोमात, नवरा कोमात!!

Marathi Jokes: किर्तन सोडून नवरा अचानक निघाला घरी; तितक्यात आली बायकोची स्वारी
एके ठिकाणी किर्तन सुरू होतं..
तितक्यात माईकवर घोषणा झाली.. गणपतरावांसाठी मेसेज आहे... ते कुठेही असतील, त्यांनी लगेच घरी पोहोचावं... सरिता वहिनी घरी त्यांची वाट पाहत आहेत.. त्यांनी ताबडतोब घरी पोहोचावं..
सूचना ऐकताच गणपतराव उठले.. घरी जायला निघाले.. तितक्यात महिलांमध्ये बसलेली त्यांची बायको सरिता उठली...
''अहो बसा बसा.. तुम्ही खरंच किर्तन ऐकायला बसला आहात की किर्तनाच्या नावाखाली भलतीकडेच गेलात ते तपासायला घोषणा करायला लावली होती मी...''