Marathi Jokes: ...अन् तेव्हापासून नवरा फिरताना सोबत ठेऊ लागला मिक्सर; बायकोच्या गुगलीवर थेट सिक्सर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 08:00 AM2021-11-29T08:00:00+5:302021-11-29T08:00:07+5:30

Marathi Jokes: बायको शेर, नवरा सव्वाशेर

Marathi Jokes husband leaves house with mixer after wife call her frequently | Marathi Jokes: ...अन् तेव्हापासून नवरा फिरताना सोबत ठेऊ लागला मिक्सर; बायकोच्या गुगलीवर थेट सिक्सर

Marathi Jokes: ...अन् तेव्हापासून नवरा फिरताना सोबत ठेऊ लागला मिक्सर; बायकोच्या गुगलीवर थेट सिक्सर

Next

एका नवऱ्याची संशयी बायको माहेरी गेली.. घरी नवरा आणि शाळेत जाणारा मुलगा असे दोघेच होते...

बायको सतत नवऱ्याला फोन करून कुठे आहात, काय करताय वगैरे प्रश्न विचारायची.. तिचे फोन सतत सुरू असायचे...

बायको- अहो कुठे आहात..? काय करताय..?

नवरा- घरीच आहे.. वॉशिंग मशीन लावतोय.. 

बायको- बरं.. आवाज ऐकवा जरा..

नवऱ्यानं फोन वॉशिंग मशीन जवळ नेला आणि मशीनचा आवाज बायकोला ऐकवला..

दुसऱ्या दिवशी बायकोचा पुन्हा फोन...

बायको- अहो कुठे आहात..? काय करताय..?

नवरा- घरीच आहे.. मिक्सर लावतोय..

बायको- आवाज ऐकवा जरा..

नवऱ्यानं फोन मिक्सरजवळ नेला आणि आवाज बायकोला ऐकवला.. पुढले काही दिवस असंच सुरू होतं...

दहा दिवसांनी बायको घरी परतली.. घरात मुलगा एकटा होता..

बायको- काय रे पप्पा कुठे आहेत..?

नवरा- चार दिवस झाले.. पप्पा घरीच आले नाहीत.. मिक्सर घेऊन गेलेत कुठेतरी...

Web Title: Marathi Jokes husband leaves house with mixer after wife call her frequently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app