Marathi Jokes: साफसफाई करताना सापडलं बायकोचं प्रगतीपुस्तक; 'गुण' वाचून नवऱ्याला आली चक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 18:00 IST2021-10-02T18:00:00+5:302021-10-02T18:00:03+5:30
Marathi Jokes: बायकोचे 'ते' गुण नवऱ्यानं कधीच पाहिले नव्हते..

Marathi Jokes: साफसफाई करताना सापडलं बायकोचं प्रगतीपुस्तक; 'गुण' वाचून नवऱ्याला आली चक्कर
नवरा घरात साफसफाई करत होता.. त्या दरम्यान कपाटात काही जुनी कागदपत्रं सापडली...
नवरा अनावश्यक कागदपत्रं बाजूला काढत होता.. त्याचवेळी हाताला बायकोचं दहावीचं प्रगतीपुस्तक लागलं...
प्रगतीपुस्तकात विविध विषयांचे गुण होते.. खाली बायकोचा स्वभाव आणि अन्य गुणांबद्दल लिहिण्यात आले होते...
ते वाचून नवऱ्याला चक्कर आली...
कारण प्रगतीपुस्तकात लिहिलं होतं, अतिशय मितभाषी आणि शांतताप्रिय विद्यार्थिनी