Marathi Jokes: बायको सेल्फी काढायची, कॅमेऱ्याची लेन्स पुसायची, पुन्हा सेल्फी काढायची; मग नवऱ्यानं दिला 'मोलाचा' सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 08:00 IST2021-05-31T08:00:00+5:302021-05-31T08:00:09+5:30
Marathi Jokes: नवऱ्याचा सल्ला अन् मग बायकोचा हल्ला

Marathi Jokes: बायको सेल्फी काढायची, कॅमेऱ्याची लेन्स पुसायची, पुन्हा सेल्फी काढायची; मग नवऱ्यानं दिला 'मोलाचा' सल्ला
बायको मोबाईलवर सेल्फी काढत होती...
सेल्फी काढून फोटो पाहायची.. मग तो डिलीट करायची...
कॅमेऱ्याची लेन्स ओढणीनं पुसायची...
पुन्हा सेल्फी काढायची.. पुन्हा डिलीट.. आणि मग पुन्हा कॅमेऱ्याची लेन्स पुसायची..
अर्ध्या तासापासून हाच प्रकार सुरू होता...
लॅपटॉपवर काम करणारा नवरा हे सगळं पाहात होता..
अर्धा तास हा प्रकार पाहिल्यावर नवरा म्हणाला..
वारंवार लेन्स पुसण्यापेक्षा एकदा तोंड पुसून बघ ना...
तेव्हापासून घरातली सगळी कामं नवराच करतोय...