Marathi Jokes: मिठीतला मी पहिला की दुसरा? नवऱ्याचा सवाल; बायकोनं मोजणीच सुरू केली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 08:00 IST2021-12-04T08:00:00+5:302021-12-04T08:00:06+5:30

Marathi Jokes: नवरा टेचात अन् बायको पेचात

Marathi Jokes husband ask trick question to wife | Marathi Jokes: मिठीतला मी पहिला की दुसरा? नवऱ्याचा सवाल; बायकोनं मोजणीच सुरू केली अन्...

Marathi Jokes: मिठीतला मी पहिला की दुसरा? नवऱ्याचा सवाल; बायकोनं मोजणीच सुरू केली अन्...

नवविवाहित पती पत्नी गप्पा मारत होते.. हळूहळू दोघेही रोमँटिक झाले.. एकमेकांच्या जवळ आले.. नवऱ्यानं बायकोला मिठीत घेतलं...

नवऱ्याला मध्येच बायकोचं शुद्धलेखन तपासण्याची हुक्की आली...

नवरा- ऐक ना...

बायको (लाजत)- बोला ना...

नवरा- मिठीतला मी पहिला की दुसरा...?

याक्षणी नवरा असं काही विचारेल याची तिला कल्पना नव्हती.. तिनं मनातल्या मनात आतापर्यंत मिठीत आलेल्या सगळ्यांची मोजणीच सुरू केली.. यात काही सेकंद गेली.. 

नवरा- अग मिठीतला मी.. पहिला की दुसरा..? ऱ्हस्व की दीर्घ..?

आता बायकोची ट्यूब पेटली.. नवरा शुद्धलेखनाबद्दल विचारतोय हे तिच्या लक्षात आलं...

बायको- मिठीतला मी पहिला.. किती सोप्पय..

बायकोचा जीव भांड्यात पडला.. तिनं ८ पर्यंत मोजणी केली होती.. पण आता पुढे मोजायची गरज नव्हती...

Web Title: Marathi Jokes husband ask trick question to wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.