Marathi Jokes: आजीनं कुटुंब वाढवण्याचा घाट घातला; नातवानं आजीचं वरचं तिकीट काढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 08:00 IST2022-03-07T08:00:00+5:302022-03-07T08:00:07+5:30

Marathi Jokes: नातू रॉक्स, आज्जी शॉक्स

marathi jokes Grandmother plans to expand family grandson gives epic reply | Marathi Jokes: आजीनं कुटुंब वाढवण्याचा घाट घातला; नातवानं आजीचं वरचं तिकीट काढलं

Marathi Jokes: आजीनं कुटुंब वाढवण्याचा घाट घातला; नातवानं आजीचं वरचं तिकीट काढलं

पिंटू- आजी टीव्ही बघू..?

आजी- नको, माझ्याशी गप्पा मार ना..

पिंटू- आजी, आपल्या घरात नेहमी सहाच सदस्य असणार का.? तू, आई, बाबा, दीदी, मी आणि माझी मांजर..

आजी- नाही बाळा.. तुझ्यासाठी उद्या कुत्रा आणतोय ना.. मग सात होणार..

पिंटू- कुत्र्यानं मांजरीला खाल्लं की मग सहाच होणार ना..?

आजी- नाही बाळा.. तुझं लग्न झाल्यावर सात होणार ना...

पिंटू- दीदी लग्न करून गेल्यावर सहाच होणार ना..?

आजी- मग तुला बाळ झालं की सात होणार ना आपण...?

पिंटू- तेव्हापर्यंत तर तू मरशील.. मग सहाच असू ना आपण..?

आजी (चिडून)- तू जा.. टीव्ही बघ..

Web Title: marathi jokes Grandmother plans to expand family grandson gives epic reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.