Marathi Jokes: गजब बेइज्जती है! 'ती' सुंदरा मनामध्ये भरली; पण अपमान करून तिनं वाट धरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 08:00 IST2021-04-23T08:00:00+5:302021-04-23T08:00:06+5:30
Marathi Jokes: ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला; पण तिनं असा अपमान का केला..?

Marathi Jokes: गजब बेइज्जती है! 'ती' सुंदरा मनामध्ये भरली; पण अपमान करून तिनं वाट धरली
एक अतिशय सुंदर, देखणी तरुणी लिफ्टमध्ये आली...
गण्या आधीच लिफ्टमध्ये होता.. मुलीला पाहताच क्षणी ती गण्याच्या मनामध्ये भरली..
मुलगी फोनवर बोलत होती.. मध्येच तिनं गण्याकडे कटाक्ष टाकला..
मुलगी- अग चल मी फोन ठेवते.. लिफ्टमध्ये एक अतिशय रुबाबदार, देखणा मुलगा आहे.. त्याच्याशी बोलता येतं का ते बघते..
गण्याच्या मनात अगदी आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या..
ती मुलगी गण्याकडे वळली अन् नम्रपणे म्हणाली...
मुलगी- सॉरी हं काका..! माझी मैत्रीण खूप पकवते.. तिनं फोन ठेवावा यासाठी खोटं बोलावं लागलं..
गण्या (मनातल्या मनात)- इतक्या कमी शब्दांत, इतक्या शिस्तीत आतापर्यंतच कोणीच माझा असा अपमान केला नव्हता...