Marathi Jokes: अफेअर आणि लग्नात काय फरक..? प्रेमविवाह झालेल्या तरुणाचं भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 18:00 IST2021-09-28T18:00:00+5:302021-09-28T18:00:03+5:30
Marathi Jokes: विवाहित तरुणानं प्रवासाचं उदाहरण देत सांगितला फरक

Marathi Jokes: अफेअर आणि लग्नात काय फरक..? प्रेमविवाह झालेल्या तरुणाचं भन्नाट उत्तर
दोन मित्र गप्पा मारत होते.. एकाचा प्रेमविवाह झालेला.. दुसऱ्याचं लग्न होणं बाकी....
पहिला- यंदा होऊ दे दोनाचे चार...
दुसरा- तुला काय जातंय सांगायला.. तुझं लग्न करून बरं चाललंय..
पहिला- तुझं पण बरं चालेल...
दुसरा- अरे ती गर्लफ्रेड असताना इतकं डोकं खाते, भांडते.. लग्नानंतर काय करेल..?
पहिला- हे बघ.. अफेअर आणि लग्न म्हणजे प्रवास असतात.. दोन्ही प्रवासांची वेगळी मजा आहे.. वेगळी वैशिष्ट्यं आहेत...
दुसरा- म्हणजे...?
पहिला- अफेअर म्हणजे बस प्रवास.. कंटाळा आला तर मध्येच उतरू शकतो..
दुसरा- आणि लग्न..?
पहिला- लग्न म्हणजे विमान प्रवास.. कितीही इच्छा झाली तरी मध्ये उतरता येत नाही...