Marathi Jokes: तुझ्यासाठी हिऱ्यांचा नेकलेस आणतोय! नवऱ्याचा भन्नाट मेसेज; बायको फसली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 08:00 IST2021-11-07T08:00:00+5:302021-11-07T08:00:02+5:30
Marathi Jokes: नवऱ्याच्या ट्रॅपमध्ये अलगद अडकली बायको..

Marathi Jokes: तुझ्यासाठी हिऱ्यांचा नेकलेस आणतोय! नवऱ्याचा भन्नाट मेसेज; बायको फसली
नवरा-बायकोचं सकाळी कडाक्याचं भांडण झालं..
नवऱ्यानं ऑफिसमधून बायकोला मेसेज केला.. 'आज रात्री माझे काही मित्र घरी येताहेत.. छान जेवण कर..'
बायकोकडून कोणताही रिप्लाय आला नाही..
नवऱ्यानं बायकोला पुन्हा मेसेज केला.. 'माझा पगार वाढलाय.. प्रमोशन मिळालंय.. पुढल्या महिन्यात तुला हिऱ्यांचा नेकलेस घेऊ..'
बायकोनं लगेच रिप्लाय केला.. 'काय सांगता..? खरंच..?'
नवऱ्यानं रिप्लाय केला.. 'नाही ग.. तुला पहिला मेसेज मिळाला की नाही ते चेक करत होतो.. नाही तर म्हणशील मला मेसेज मिळालाच नाही.. मी पाहिलाच नाही मोबाईल..'