Marathi Jokes: आधी बुलेट विकून स्कूटर घेतली, मग स्कूटर विकून पुन्हा बुलेट घेतली; कपलचा भन्नाट 'प्रवास'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 10:20 IST2021-12-14T10:20:27+5:302021-12-14T10:20:39+5:30
Marathi Jokes: परिस्थिती पाहून तरुणाचे भन्नाट निर्णय

Marathi Jokes: आधी बुलेट विकून स्कूटर घेतली, मग स्कूटर विकून पुन्हा बुलेट घेतली; कपलचा भन्नाट 'प्रवास'
आधी बुलेट विकली, मग स्कूटर घेतली, परत बुलेट घेतली; नवऱ्यासोबत घडला भन्नाट प्रकार
एका तरुणाकडे दणकट बुलेट होती... तिच्या फायरिंगचा आवाज जबरदस्त होता.. रस्त्यावरून जाताना सगळेच वळून पाहायचे...
थोड्या दिवसानं तो तरुण प्रेमात पडला.. लाँग ड्राईव्हला जाताना बुलेटचा आवाज त्रासदायक वाटू लागला.. गर्लफ्रेंडचं बोलणंच त्या फायरिंगमुळे ऐकू येईना.. मग त्यानं त्याची लाडकी बुलेट विकली अन् स्कूटर घेतली..
आता तो स्कूटरवरून गर्लफ्रेंडसोबत फिरू लागला.. दोघांचं छान चाललं होतं.. लाँग ड्राईव्हवर असताना मस्त गप्पा होऊ लागल्या..
पुढे काही महिन्यांत दोघांचं लग्न झालं.. गर्लफ्रेंडची बायको झाली.. तेव्हाही ते लाँग ड्राईव्हला जायचे.. पण काही अनुभवांमध्ये त्याला शहाणपण सुचलं.. त्यानं स्कूटर विकली अन् पुन्हा फायरिंगचा जबरदस्त आवाज असलेली बुलेट घेतली..