Marathi Jokes: ...अन् सर्व जावयांनी केली सासऱ्यांविरोधात युती; नवऱ्याचं 'लॉजिक' ऐकून बायका वैतागल्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 18:00 IST2021-10-14T18:00:00+5:302021-10-14T18:00:02+5:30
Marathi Jokes: नवऱ्यांचं भन्नाट लॉजिक ऐकून बायका गपगार

Marathi Jokes: ...अन् सर्व जावयांनी केली सासऱ्यांविरोधात युती; नवऱ्याचं 'लॉजिक' ऐकून बायका वैतागल्या!
आमची मुलगी खूप शांत, समजूतदार, मनमिळाऊ, अगदी गरीब गाय असं म्हणत एका बापानं चार मुलींची लग्नं उरकली..
पण लग्नानंतर मुलींनी रंग दाखवले.. गरीब गायींची शिंग त्यांच्या नवऱ्यांना टोचू लागली..
शेवटी सगळे जावई एकत्र आले.. त्यांनी सासऱ्याविरोधात युतीच केली...
ते पाहून त्यांच्या बायका वैतागल्या.. आम्हाला काय बोलायचंय ते बोला आमच्या वडिलांना का बोलता, असा रोकडा सवाल त्यांनी विचारला..
सगळे जावई एकासुरात म्हणाले, आपण टीव्ही खराब झाला की त्या टीव्हीला काही बोलतो का..? कंपनीलाच शिव्या घालतो ना..?