मराठी जोक : जेवायला खिचडी करू, पुलाव की बिर्याणी, नवरा म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 16:50 IST2023-07-18T16:50:06+5:302023-07-18T16:50:35+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : जेवायला खिचडी करू, पुलाव की बिर्याणी, नवरा म्हणाला...
एक नवरा बायकोच्या स्वयंपाकाला वैतागला होता..
ती करायला जायची एक आणि व्हायचं भलतंच...
तरी पण बायकोचा आत्मविश्वास तगडा होता.. अशाच आत्मविश्वासानं ती स्वयंपाकघरातून बाहेर आली..
बायको- अहो... ऐका ना...
नवरा- बोल ना...
बायको- आज जेवायला काय करू..? खिचडी, पुलाव की बिर्याणी..?
नवरा- तू आधी कर.. नामकरण सोहळा आपण नंतर करू..