मराठी जोक : बँकेत खात्यासाठी फॉर्म भरताना काका जबरदस्त भडकले आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 15:06 IST2023-12-08T15:05:45+5:302023-12-08T15:06:23+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : बँकेत खात्यासाठी फॉर्म भरताना काका जबरदस्त भडकले आणि...
एक काका बँकेत खाते उघडायला गेले.
तेथील क्लार्कने त्यांना एक अर्ज भरायला दिला.
त्यावर लिहिले होते, "नमुन्याची सही".
काका भडकले आणि त्यांनी आक्षेप घेतला....
त्यांनी क्लार्कला विचारले की,
"मी 'नमुना' आहे का....?"
क्लार्कने माफी मागितली,
आणि अर्जावर लिहीले......
"सहीचा नमुना".
मातृभाषेमध्ये फक्त शब्दांना नव्हे,
तर क्रमालासुद्धा महत्त्व असते......!