marathi joke on life after marriage | सुखी संसाराची PPT
सुखी संसाराची PPT

दोन जिवाभावाचे मित्र......

अगदी लहानपणापासून शाळा, कॉलेज, नोकरी सोबत सोबत होती..

योगायोग इतका जबरदस्त की, तीन महिन्यांपूर्वी पाठोपाठ दोघांचंही लग्न झालं.....

त्यानंतर आज पहिल्यांदाच ते एका कॉफीशॉपमध्ये भेटले. 

इकडच्या तिकडच्या गप्पा आटोपल्यावर साहजिकच विषय निघाला लग्नानंतरच्या आयुष्याचा....

एकाने दुसऱ्याला उत्सुकतेने विचारले....

"बोल दोस्ता, काय म्हणतेय लाईफ???"

दुसऱ्याची टेप लगेच सुरु झाली...

"अरे, झकास यार... 

अगदी माझ्यासारखाच हिला पण प्युअर दुधाचा चहा आवडतो....

पण हिच्यावर झालेले माहेरचे काटकसरी संस्कार...

काही केल्या नुसत्या दुधाचा चहा करणं हिला अजिबात पटत नाही....

मग काय?????
 
मी मस्त आलं घालून प्युअर चहा बनवतो राजाराणीसाठी....

चहा आटोपला की, लगेच ती सिंकवरचा नळ उघडते, आणि मी कपबश्या विसळून ठेवतो....

ज्या दिवशी तिला भाजी सुचवायचा कंटाळा येतो, त्यादिवशी मी माझ्याच आवडीची भाजी करतो..

तिला पण माझी चॉईस आवडते....

स्वच्छतेच्या बाबतीत हिचा कुणीच हात धरू शकत नाही.. पण शेवटी मी नवरा आहे तिचा. 

पटकन तिचा नाजूक हात धरतो, फरशी पुसायचा कपडा हळुवार हिसकुन घेतो आणि अगदी लख्ख फरशी पुसून काढतो....."

"बरं, माझं जाऊ दे... तुझं कसं काय सुरु आहे??" त्याने दुसऱ्याला विचारले....

माझं काय होणार डोंबलं???
तुझ्याइतकीच बेइज्जती माझी पण सुरू आहे..
पण मला तुझ्यासारखं आकर्षक पॉवरपॉईंट प्रेझेन्टेशन नाही बनवता येत.....

☺☺☺☺☺

Web Title: marathi joke on life after marriage

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.