Marathi Joke : तासभर साड्या पाहिल्यानंतरही महिलेला साडी आवडली नाही, जाताना म्हणाली,,,

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 16:47 IST2024-04-22T16:47:33+5:302024-04-22T16:47:46+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke : Even after looking at the saree for an hour, the woman did not like the saree, said on the way,,, | Marathi Joke : तासभर साड्या पाहिल्यानंतरही महिलेला साडी आवडली नाही, जाताना म्हणाली,,,

Marathi Joke : तासभर साड्या पाहिल्यानंतरही महिलेला साडी आवडली नाही, जाताना म्हणाली,,,

एक महिला साड्यांच्या दुकानात गेली... दुकानातील कर्मचाऱ्यानं तिला बऱ्याचशा साड्या दाखवल्या...

नवीन पॅटर्न, नवी स्टाईल, बांधणी, पैठणी, नऊवारी, सहावारी... सगळ्या प्रकारच्या साड्या दुकानदारानं दाखवल्या..

महिलादेखील 'या पॅटर्नमध्ये दुसरा रंग दाखवा', 'याच रंगात दुसरा पॅटर्न दाखवा' म्हणत आणखी साड्या पाहत होती...

यात जवळपास एक तास गेला... महिलेला एकही साडी आवडली नाही...

दुकानदार- माफ करा हा मॅडम...! तुम्हाला पसंत येईल अशी एकही साडी मी दाखवू शकलो नाही..

महिला- ठीक आहे हो... तसंही मी बाजारात फक्त भाजीच घ्यायला आले होते...

Web Title: Marathi Joke : Even after looking at the saree for an hour, the woman did not like the saree, said on the way,,,

टॅग्स :Jokesविनोद