यापेक्षा मोठा अपमान असूच शकत नाही; वाचाल तर हसाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 11:02 IST2020-09-14T10:59:36+5:302020-09-14T11:02:21+5:30
शेरास सव्वाशेर भेटतच असतो.. कधीकधी अपमान होतच असतो..

यापेक्षा मोठा अपमान असूच शकत नाही; वाचाल तर हसाल
एक पुरुष बसमध्ये एका सुंदर महिलेच्या शेजारी बसला होता.
बोलायला विषय हवा म्हणून त्यानं तिच्या परफ्युमच्या सुगंधाचं कौतुक सुरू केलं..
'तुम्ही लावलेल्या परफ्युमचा सुगंध अतिशय छान आहे. मला त्याचं नाव समजेल का..? मला तो माझ्या पत्नीला गिफ्ट देता येईल'
ती सुंदर महिला या पुरुषापेक्षा हुशार निघाली. तिनं लगेचच उत्तर दिलं.
'हा परफ्युम तुम्ही तुमच्या पत्नीला अजिबात देऊ नका.. अन्यथा काही चालू पुरुषांना तिच्याशी संवाद साधण्याचा बहाणा मिळेल..'