Marathi Jokes: पूर्वकल्पना न देता नवऱ्यानं मित्राला घरी जेवायला बोलावलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 14:22 IST2020-09-19T14:22:13+5:302020-09-19T14:22:39+5:30
पती मित्रासोबत घरी आलेला पाहून पत्नी संतापली...

Marathi Jokes: पूर्वकल्पना न देता नवऱ्यानं मित्राला घरी जेवायला बोलावलं अन्...
एकदा पतीनं त्याच्या मित्राला संध्याकाळी ७ वाजता ऑफिस सुटल्यानंतर घरी जेवायला बोलावलं. विशेष म्हणजे त्यानं पत्नीला कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती.
मित्र घरी येताच पत्नी नवऱ्याला ओरडली.
पत्नी- माझं केस बघा. मी मेकअप केलेला नाही. घराची अवस्था पाहा. मी अजूनही गाऊनमध्ये आहे. मी आज प्रचंड दमलेय. त्यामुळे जेवणही करू शकणार नाही. तुम्ही काय विचार करून मित्राला घरी घेऊन आलात? आणि तेही मला न विचारता.
पती- अगं, हा मूर्ख लग्न करण्याचा विचार करतोय. त्यामुळे मी त्याला घरी आणलं. म्हटलं लग्नानंतर काय होतं त्याचा एकदा डेमो तर बघून घे.