Marathi Jokes: ब्युटीफुल...!!! बायकोच्या फोनवर मध्यरात्री आलेल्या मेसेजनं नवऱ्याची झोप गुल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 16:25 IST2020-10-20T16:25:41+5:302020-10-20T16:25:58+5:30
Marathi Jokes: बायकोच्या फोनवर कोणाचा मेसेज आला, त्या विचारानं नवऱ्याची झोपच उडाली

Marathi Jokes: ब्युटीफुल...!!! बायकोच्या फोनवर मध्यरात्री आलेल्या मेसेजनं नवऱ्याची झोप गुल
मध्यरात्री बायकोच्या फोनमधून नोटिफिकेशनचा आवाज आला. त्या आवाजानं नवऱ्याला जाग आली.. स्क्रीनवरील शब्द वाचून नवऱ्याची झोपच उडाली..
नवरा (अतिशय रागानं)- हा कोणाचा मेसेज आहे..? मध्यरात्री तुला कोण ब्युटीफुल म्हणतंय..?
नवऱ्याचे शब्द ऐकून बायकोला काही कळेना.. तिनं नवऱ्याकडून फोन घेतला आणि चेक केला..
बायको- अहो, चष्मा वापरा ना.. ब्युटिफुल नाही, बॅटरी फुलचं नोटिफिकेशन आहे.. झोपा आता शांत..