Marathi Jokes: वाईन शॉपच्या मालकाला दारुड्याचा मध्यरात्री फोन; म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 07:28 IST2020-12-15T07:27:02+5:302020-12-15T07:28:48+5:30
Marathi Jokes: दारुड्याच्या फोनमुळे वाईन शॉपच्या मालकाची झोपमोड

Marathi Jokes: वाईन शॉपच्या मालकाला दारुड्याचा मध्यरात्री फोन; म्हणाला...
एका दारुड्यानं मध्यरात्री वाईन शॉपच्या मालकाला फोन केला.
दारुडा- तू दुकान कधी उघडणार..?
मालक- सकाळी ९ वाजता..
थोड्या वेळानं दारुड्यानं पुन्हा फोन केला...
दारुडा- तू दुकान कधी उघडणार..?
मालक- अरे सांगितलं ना, सकाळी ९ वाजता..
थोड्या वेळानं दारुड्यानं पुन्हा फोन केला...
दारुडा- तू दुकान कधी उघडणार..?
मालक- अरे बेवड्या, सांगितलं ना तुला ९ वाजता उघडणार दुकान.. सकाळी ९ वाजता ये...
दारुडा- मी तुमच्या दुकानाच्या आतून बोलतोय..
मालक घाबरून दुकानाजवळ पोहोचला.. कुलूप उघडून दारुडा खरंच तिथे आहे का ते पाहू लागला..
तितक्यात दारुडा मागून आला आणि म्हणाला.. 'आता दुकान उघडलंच आहे, तर एक क्वार्टर रॉयल स्टॅग द्या ना...'