शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

युगपुरुष लोकमान्य टिळक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 06:10 IST

स्वत्व हरवून बसलेल्या जनतेच्या मनात टिळकांनी स्वातंत्र्याची ऊर्मी जागवली.  बहुआयामी टिळकांचे व्यक्तिमत्त्व अथांग महासागरासारखे होते; पण  स्वतंत्र भारताची पुनर्बांधणी हेच त्यांचे ध्येय होते.  टिळक विचार स्वप्नदर्शक नव्हते,  त्याला आधुनिकता आणि वास्तवतेची कास आहे.

ठळक मुद्दे1 ऑगस्ट 2020 रोजी लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिशताब्दीची सांगता. त्यानिमित्त..

- डॉ. दीपक ज. टिळक.आधुनिक भारताच्या नवनिर्मितीच्या युगावर ज्यांच्या बीज-विचारांचा प्रभाव दिसतो, ते युगपुरुष म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्यांचे व्यक्तिमत्त्व, कार्य, विचार हे अथांग महासागरासारखे आहेत. एकाचवेळी अनेक गोष्टीत ते कार्यरत होते; पण ध्येय एकच होते. स्वतंत्र भारताची पुनर्बांधणी. टिळक विचार हे स्वप्नदर्शक नसून, त्याला तात्त्विक अधिष्ठान, आधुनिकता आणि वास्तवतेची कास आहे.लोकमान्य टिळकांचे ओरायन, आक्र्टिक होम इन वेदाज्, ब्रrासूत्र, वेदांग ज्योतिष आणि गीतारहस्य या स्वतंत्र संशोधनात्मक लेखनाचा केवळ भारतीय नव्हे, तर पाश्चिमात्य विद्वानांनी गौरव केला. टिळकांच्या पहिल्या दोन ग्रंथांमुळे भारतीय जनतेत स्वत्व जागृत झाले. टिळक युगाच्या इतिहासाचा थोडक्यात मागोवा घेतल्याखेरीज टिळकांच्या विचारांचा मागोवा घेणो अवघड.टिळकांच्या जन्मानंतर त्या काळात इंग्रजांचे एकछत्री राज्य भारतावर निर्माण झाले. भारत त्याअगोदर कधीच एक राष्ट्र नव्हते. इंग्रजांनी विविध राज्ये, प्रदेश एका कायद्याच्या चौकटीत आणले होते. इंग्रजांच्या वसाहतवादी धोरणाने देशी उद्योगधंद्यांची, शेतीची दुरवस्था झाली होती. रोगराई, बेरोजगारी, अशिक्षितपणा, अन्याय यांमुळे हिंदुस्थानातील जनता त्रस्त होती. त्याचवेळी इंग्रजी शिक्षण घेऊन उच्चशिक्षित तरुणांची पिढी भारतात कार्यरत झाली. इंग्रजांच्या यांत्रिक संशोधनामुळे रेल्वे, यंत्रमाग, पूल, तारायंत्र इत्यादी गोष्टींमुळे सामान्य जनता चकित झाली होती. पारतंत्र्यामुळे भारतीय जनतेची प्रगती अशक्य झाली होती. इंग्रजी भाषेबरोबर इंग्रजी संस्कृती, धर्माचे मायाजाल सर्वत्र पसरत होते. किंबहुना हिंदुस्थानातील जनतेस उच्च वैदिक संस्कृती, स्वधर्म यांचा विसर पडला होता. जनता आपले स्वत्व हरवून बसली होती.लोकमान्य टिळकांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, वैचारिक, धार्मिक, वेदांतिक चळवळीची मूलतत्त्वे ही त्यावेळच्या समस्यांत सापडतात. जहाल-मवाळ, ब्राrाण-ब्राrाणोतर, सुधारक-पुरोगामी, हिंदू-मुसलमान, ब्राrाण्य.. या सर्व वादांवर राष्ट्रनिर्मितीच्या एका ध्येयात उत्तर आहे. हे वाद टिळकांच्या ध्येयापुढे थोटके आहेत. एखादी चळवळ उभी करताना लोकांना एकत्र आणणो, त्यांना आपल्या विचाराने, ध्येयाने प्रेरित करून लोकशिक्षण देणो आणि लोकांना कार्यरत करणो हे तीन प्रमुख भाग असतात. लोकमान्य टिळकांनी सर्व धर्म व जाती-जमातींना गणोश उत्सव व छत्रपती शिवाजी महाराज जयंती या राष्ट्रीय उत्सवांद्वारे, तसेच फेमिन कोड, दारूबंदी, होमरूल लीग या चळवळींद्वारे एकत्र आणले. व्याख्याने, अग्रलेख, मेळे, नाटक, कविता, कीर्तन, पोवाडे इत्यादी माध्यमांद्वारे लोकांना शिक्षित केले आणि स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षणाद्वारे कार्यरत केले.भारतीय राजकीय सत्ताकरणात ‘लोक’ ही संकल्पनाच प्रथम टिळकांनी मांडली. लोकशाही मूल्यांवर टिळकांचा गाढा विश्वास होता. सर्व सुशिक्षित लोकांना टिळकांनी समाजात मिसळण्यास सांगितले. टिळकांच्याच शब्दांत सांगावयाचे, तर ज्ञानी लोक हे समाजाचे (राष्ट्राचे) डोळे आहेत. त्यांनी डोळे बंद केले आणि समाज भरकटला, तर दोष ज्ञानी लोकांचा आहे, समाजाचा नाही. स्वत्व व समानहित तत्त्व या दोन स्तरांवर टिळकांनी हिंदू-मुसलमानांत ऐक्य निर्माण केले.लोकमान्य टिळकांनी सार्‍या हिंदुस्थानातील लोकांत स्वत्व आणि राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण केली. राष्ट्रप्रेम जागृत केले. विविधतेत एकात्मता आणली. टिळकांनी देशभक्ती आणि वेदांचे आध्यात्मिक नाते सांगितले. वेदांत हे परोपकाराचे मोठे माप, तर राष्ट्रप्रेम हे धाकटे माप. आपल्या एकसष्टीच्या समारंभात टिळकांनी ‘आपण सर्व राष्ट्रदेव होऊयात’ असे आवाहन केले. स्वराज्याचा उल्लेख करताना ‘स्व’ म्हणजे ‘प्रजा’ म्हणजेच प्रजेचे राज्य ही लोकशाहीची बीजे सांगितली. आमच्या घराचा कारभार आपण करावयाचा, इतक्या सोप्या भाषेत स्वराज्याचा विचार मांडला. लोकमान्य टिळकांच्या स्वराज्याच्या उच्चारात भगवद्गीतेप्रमाणो स्वातंत्र्य हा जन्मसिद्ध हक्क जसा सामील होता; तसाच स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वाभिमान, स्वदेशीही सामील होता.लोकमान्य टिळकांनी पुरस्कारलेल्या स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षणात आधुनिक भारताच्या पायारचनेचे बीज विचार आहेत. या विचारांत राष्ट्रीय, आर्थिक धोरण, स्वदेशी उद्योगधंदे, व्यापार्‍यांची प्रगती, उपयुक्त शिक्षण, सहकार, रोजगार, संशोधन, शेती, उत्पादनाची वृद्धी इत्यादी प्रगतशील भारताचे बीज विचार आहेत.बहिष्कार हे अहिंसक शस्त्र टिळकांनी सर्वसामान्य जनतेस दिले आणि पारतंत्र्यात स्वदेशी मालास बाजारपेठ निर्माण करून देशी उद्योगांना ऊजिर्त केले. स्वदेशी बँक, बॉम्बे स्वदेशी स्टोअर, पैसा फंड, साधना विद्यालय या पूरक चळवळी उभ्या केल्या.लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्याने निवृत्तीपर आध्यात्मिक विचाराला प्रवृत्तीपर केले. व्यक्ती, समाज आणि देश या चढत्या क्रमाने कर्माचा मार्ग दाखविला. संसारात राहून देशकार्य कसे करता येते, हे सांगितले. किंबहुना कर्मयोग स्वत: आचरणात आणून लोकांसमोर उदाहरण उभे केले. लोकांना नीतिशास्त्र समजावले. लोकमान्य टिळकांच्या चरित्र, चारित्र्य आणि विचारांचा मागोवा घेताना त्यात आधुनिक भारताच्या नव-निर्मितीची बीजे आढळतात. टिळक चरित्र हे नुसते जाणण्यापेक्षा अनुकरणीय आहे. आजही भारतापुढे जेव्हा राष्ट्रीयत्व, स्वातंत्रता, प्रजासत्ताक राज्यपद्धती, लोकशाही, बेरोजगारी, शेती समानता असे प्रश्न उद्भवतात, तेव्हा लोकमान्य टिळकांच्या बीज विचारांचा संदर्भ घ्यावा लागतो.अशा या स्वतंत्र आधुनिक भारताच्या निर्मितीस बीज विचार देणार्‍या युगपुरुषास स्मृतिशताब्दी निमित्ताने विनम्र अभिवादन.

(लेखक, लोकमान्य टिळकांचे पणतू, दै. केसरीचे संपादक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू आहेत.)