शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

तरुणाईचा जागर

By admin | Updated: January 23, 2016 14:58 IST

साहित्यबाह्य गोष्टींमुळे गाजलेल्या साहित्य संमेलनाचं फलित काय? संमेलनात सहभागींचे पन्नाशीच्या पुढे गेलेले वय यंदा पहिल्यांदाच तरुण झाले! मराठी साहित्याचा लोकोत्सव तरुणाईला भावणा:या झगमगाटी वातावरणात करायचा, की केवळ वाद घडवून चार भिंतींच्या आत संमेलन पार पाडायचे, हा प्रश्नही पिंपरी साहित्य संमेलनाने उपस्थित केला आहे.

- अविनाश थोरात
 
 
साहित्य संमेलन झाल्यानंतर चर्चाच्या फैरी झडू लागतात. ‘संमेलनातून काय मिळाले?’ येथपासून ‘मराठी साहित्य, मराठी साहित्यिकांना काय दिले?’ येथर्पयत चर्चा घडते. या सगळ्या पाश्र्वभूमीवर, पिंपरी येथे झालेल्या 89व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची फलश्रुती म्हणजे तरुणाईच्या अजेंडय़ावर मराठी साहित्य आले. ज्येष्ठ लेखक-गीतकार जावेद अख्तर यांनी संमेलनाच्या समारोपातच नवी पिढी पुन्हा एकदा साहित्यासारख्या कलेकडे वळू लागली असल्याबद्दल समाधान व्यक्त केलेच; पण संमेलनस्थळी सेल्फी स्टिक विक्रेत्यांच्या झालेल्या गर्दीने अगदी व्यावहारिक रूपात हे सिद्ध केले, की या संमेलनाला मोठय़ा प्रमाणावर तरुणाई आली आहे. यूपी, बिहारच्या या विक्रेत्यांना हे समजले; मात्र आपल्या मराठी साहित्यिकांना समजले नाही, हा प्रश्न अलाहिदा..
अनेक वर्षापासून मराठी साहित्य एका चौकटीत अडकले आहे. वय वर्षे पन्नाशीनंतरच्यांचा हा उद्योगही म्हटले जात होते. साहित्य संमेलनाला तर ‘रिकामटेकडय़ांचा उद्योग’ म्हणूनही हिणवले गेले. ‘मानाने बोलावणो आल्याशिवाय नाही’ हा मराठी साहित्यिकांचा ताठा आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाचाच साहित्यबाह्य गोष्टी पुढे रेटण्यातील रस यामुळे साहित्य संमेलनात सहभागी होणा:यांचे सरासरी वय पन्नाशीच्या पुढे गेले होते. तरुणाईला साहित्याकडे वळविण्यासाठी, किमान त्यांच्यामध्ये त्याविषयी कुतूहल निर्माण करण्यासाठी एका मोठय़ा ‘लिफ्ट’ची गरज होती. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने पिंपरीत भरविलेल्या साहित्य संमेलनातून ती देण्यात स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. पी. डी. पाटील यशस्वी ठरले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मुळात डी. वाय. पाटील विद्यापीठानेच संमेलन भरविले असल्याने आजकालच्या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’च्या युगात यशस्वीतेसाठी विद्यार्थी आणून बसविले असते तरी कोणी हरकत घेतलीही नसती. मात्र, संमेलनाच्या सर्वच कार्यक्रमांमध्ये ज्या पद्धतीने तरुणाईने सहभाग घेतला, त्यामध्ये शिस्तीच्या बडग्यापेक्षा उत्स्फूर्तताच जाणवत होती. राज्याच्या विविध भागांतून खास या संमेलनासाठी तरुण आले होते. प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांना ऐकण्यासाठी जमलेल्या 17 ते 18 हजार तरुणांकडून मिळालेला प्रतिसाद पाहून ‘जयपूर लिटररी फेस्ट’लाही या संमेलनाने मागे टाकले असल्याचे सांगण्याचा मोह त्यांना आवरला नाही. जावेद अख्तर यांनीही याच भावना व्यक्त केल्या. 
गेल्या वर्षी पंजाबातील घुमान येथे भरलेल्या साहित्य संमेलनाला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या वक्तव्यामुळे उठलेल्या वादात पिंपरी येथील संमेलन झाकोळले जाते की काय? अशी भीती होती. मात्र, संमेलनात विविध कार्यक्रमांचे नेटके नियोजन आणि कल्पकता असल्याने केवळ साहित्यिकांसाठीच नव्हे, तर सामान्यांसाठीही ते चांगले ‘पॅकेज’ ठरले. कोणत्याही निमित्ताने का होईना, मराठी माणूस संमेलनाला हजेरी लावतोय, कविकट्टय़ावर कविता ऐकण्याचा आनंद घेतोय, उत्सुकता म्हणून एखाद्या परिसंवादात डोकावतोय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रंथदालनात एक चक्कर मारतोय, हे मनोहारी दृश्य दिसत होते. माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणायचे, ‘पुस्तके वाचली गेली नाहीत तर एक वेळ चालेल; पण त्यांच्या सहवासात राहणोही महत्त्वाचे असते.’’ येथे तर त्याच्या पुढे जाऊन गेल्या 88 वर्षात झाली नाही एवढी ग्रंथविक्री झाली. तब्बल चार कोटींची पुस्तके विकली गेली. प्रकाशकांना यातून नवीन उभारी मिळेल, लेखकांना प्रेरणा मिळेल हीदेखील या संमेलनाची एक फलश्रुतीच म्हणायची. 
मराठी साहित्य संमेलन आणि वाद एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. चर्चा होणार, वाद झडणारच आणि साहित्य व्यवहारात त्यांचे महत्त्वही आहे. मात्र, संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या साहित्यबाह्य वक्तव्यांनी यावेळी वादाचा धुरळा उडाला. संमेलनस्थळी त्यांना पाऊल टाकू देणार नाही हा भारतीय जनता पक्षाचा इशारा, त्यातच सनातन संस्थेच्या वकिलाने केलेले ट्विट यांमुळे या वादाला राजकीय स्वरूप आले. साहित्यिक आणि महामंडळाच्या बोटचेप्या धोरणावर अनेकांनी आक्षेप घेतले, तर ‘कोण हे सबनीस?’ असा सवालही केला गेला. मात्र, या सगळ्या वादातूनच सबनीस यांचे नेतृत्व उभरत जावे तसे झाले. त्यांच्या भाषणाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. पी. डी. पाटील यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला. पण या सगळ्या वादात ‘फायरब्रॅँड’ साहित्यिक अशी प्रतिमा झालेल्या सबनीसांनी मांडलेले संवाद-संघर्षाचे सूत्र आणि प्रस्थापितविरोधी भूमिका व प्रसंगी मूर्तिभंजन यांनाही तरुणाईने मोठा प्रतिसाद दिला. 
साहित्यिक गोष्टींची चर्चा होण्याबरोबरच साहित्यात कोणत्या गोष्टी याव्यात, याची झालेली चर्चाही महत्त्वाची ठरली. जावेद अख्तर यांच्यासारखा महाराष्ट्रात पन्नासहून अधिक वर्षे राहत असलेला ज्येष्ठ लेखक ‘मराठी साहित्य इतर भाषांत जात नाही’ हे सांगतो. ‘जीवनासाठी कला की कलेसाठी कला?’ या वादाचा संदर्भ देऊन मध्यमवर्गीय साहित्यिक आपली जबाबदारी विसरला, हे सांगताना साहित्यिकांनी जबाबदारी स्वीकारून समाजातील शोषित-पीडितांना न्याय द्यावा, हे सांगतो. मराठीत यापूर्वी बंडखोर साहित्य निर्माण झाले आहे; मात्र गेल्या पिढीने भौतिक प्रगतीच्या हव्यासापायी आपला सांस्कृतिक ठेवाच सोडून दिला, याबद्दल खंत व्यक्त करतो हे मराठी साहित्यिकांच्या डोळ्यांत अंजन घालण्यासारखे होते. राजकारण्यांच्या संमेलनातील उपस्थितीबाबत अनेकदा विरोधी सूर लावला जातो; परंतु नितीन गडकरी यांच्यासारख्या नेत्यांनाही लेखकांना ‘नव्या जमान्याच्या हाका ओळखा, काळ दररोज बदलत असताना ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान यांच्याबरोबर नवे संशोधन, कल्पना यांनाही साहित्यात स्थान द्या, भविष्यातील माणूस घडविण्यासाठी योगदान द्या,’ असे आवाहन करावेसे वाटते, याचा विचार करण्याची गरज आहे. एका अर्थाने ‘जीवनासाठी कला’ हे सूत्रच ते मांडतात. 
संमेलनाच्या खर्चापासून वेगवेगळ्या वादांर्पयत अनेक चर्चा होत आहेत. मराठी साहित्य संमेलन हा साहित्याचा उत्सव आहे; तो व्हायलाच पाहिजे, अशी भूमिका सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्यापासून अनेकांनी मांडली; परंतु या सगळ्या वादांच्या पाश्र्वभूमीवर पुढच्या काळात आयोजनासाठी लोक स्वत:हून पुढे येतील का? हा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. समारोपाच्या कार्यक्रमात माजी मंत्री विनय कोरे यांनी स्पष्टपणो सांगितले, की आपलीही संमेलन घेण्याची इच्छा होती; मात्र हे सगळे वाद बघून पाय जरा मागेच हटत आहेत. पी. डी. पाटील यांना यशस्वी मध्यस्थी करायला जमले, कारण ते राजकारणात नाहीत. राजकारणाशी संबंधितांना हे जमेल की नाही, शंका आहे. कोरे यांना जाहीरपणो ही भूमिका मांडावी लागली, याचे कारण म्हणजे आपल्या समाजात आता एखाद्याने काही घडविण्याचा प्रयत्न करणोच गुन्हा झाला आहे. अगदी छोटय़ा-छोटय़ा गोष्टींतही न्यून काढण्याचा प्रयत्न केला जातो. डॉ. पी. डी. पाटील तर म्हणाले, की चूक असो की नसो; वधुपित्याप्रमाणो माफी मागायची, असा सल्ला मला दिला गेला होता आणि तो मी पाळलाही! साधनसामग्री आणि आर्थिक क्षमता असणारे शेकडो जण महाराष्ट्रात असतानाही किती जण कळकळीने साहित्याचा उत्सव करायला तयार होतात, हा प्रश्न आहे. संमेलनाचे सूप वाजले असले, तरी त्याच्या चर्चा झडत राहणारच आहेत. मराठी साहित्याचा हा लोकोत्सव तरुणाईला भावणा:या झगमगाटी वातावरणात करायचा, की केवळ वाद घडवून चार भिंतींच्या आत होणारी चर्चा ठेवत संमेलन पार पाडायचे, हा प्रश्न पिंपरी साहित्य संमेलनाने उपस्थित केला आहे. मात्र, या सगळ्यामध्ये तरुणाईलाही मराठी साहित्याविषयी निर्माण झालेली उत्सुकता ही जास्त महत्त्वाची ठरणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची मागणी असो, की मराठी शाळांच्या कमी होणा:या संख्येबाबत व्यक्त होणारी चिंता असो; पिंपरी साहित्य संमेलनात दिसली तशी तरुणाई सोबत असेल, तर मराठी भाषेच्या संवर्धनाची चिंताच करण्याची गरज उरणार नाही, हे निश्चित!
 
एक प्रश्न. लेखकांना!
अच्युत गोडबोले किंवा श्रीनिवास ठाणोदार यांच्यासारख्या वेगळ्या प्रकारचे लिखाण करणा:या लेखकांना ऐकण्यासाठी सभामंडप पुरत नाही, चेतन भगत यांच्यासारखा प्रसिद्ध लेखक जडजंबाळ शब्द न वापरता ‘वेल रेड’ होण्याचा संदेश देतो. तरुणाई त्याला प्रतिसादही देते, कारण तो त्यांच्याच भाषेत बोलतो, त्यांच्याशी संवाद साधतो. आपण मात्र या सगळ्यामध्ये मराठी साहित्यिक संमेलनात दिसला नाही, अशी खंत व्यक्त करीत राहतो. मात्र, व्यासपीठावर संधी मिळाली नाही तर संमेलनस्थळी फिरकायचेच नाही, अशी भूमिका असलेल्या साहित्यिकांची कमतरता नाही. येथे ज्येष्ठ कवी कै. मंगेश पाडगावकर यांची आठवण येते. सासवड साहित्य संमेलनात विशेष निमंत्रित नसतानाही पाडगावकरांनी स्वत:हून हजेरी लावली होती. ते ग्रंथप्रदर्शनात फिरले, तरुणांशी-विद्याथ्र्याशी बोलले. किती मराठी लेखकांनी स्वत:हून साहित्य संमेलनात हजेरी लावली? हा प्रश्न लेखकांनीच स्वत:ला विचारला पाहिजे.
 
(लेखक लोकमतच्या पुणो आवृत्तीत 
मुख्य उपसंपादक आहेत.)
avinash.thorat@lokmat.com