शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

मोबाइल इंटरनेट बिलात स्वस्ताईची आणखी चंगळ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 06:05 IST

मोबाइल सेवा देणाऱ्या कंपन्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये सवलतींची अक्षरशः खैरात वाटली. त्यामुळे कठीण परिस्थितीतून जात असलेल्या कंपन्यांवर सरकारचे देणे देण्यासाठी पैशांचा ठणठणाट झाला. या कंपन्यांना तारून नेण्यासाठी सरकारने अनेक योजना जाहीर केल्या. त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार का?

ठळक मुद्देयेत्या काळात मोबाइल बिल आणखी कमी येईल? डेटा पॅक स्वस्त होईल? - सर्वसामान्यांना या प्रश्नांची उत्कंठा लागून राहिली आहे.

- पवन देशपांडे

आपला मोबाइल डेटा एवढा स्वस्त आहे की, सध्या रोज एक जीबी डेटा वापरला तरी तो महिनाभर पुरतो. कॉलिंग तर जवळपास मोफतच आहे. त्यामुळे मोबाइलचे जाळे आणि स्मार्टफोन वापरणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. मोबाइल सेवा देणाऱ्या कंपन्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये सवलतींची अक्षरशः खैरात वाटली. त्यामुळे कठीण परिस्थितीतून जात असलेल्या कंपन्यांवर सरकारचे देणे देण्यासाठी पैशांचा ठणठणाट झाला. या कंपन्यांना तारून नेण्यासाठी सरकारने अनेक योजना जाहीर केल्या. त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार का? मोबाइल बिल कमी येईल का? डेटा पॅक स्वस्त होईल का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. या नव्या धोरणामुळे अनेक गोष्टीही बदलणार आहेत.

ग्राहकांना काय फायदा?

तोट्यात चालत असलेल्या टेलिकॉम कंपन्या सेवांचे दर वाढवण्याचा विचार करत होत्या. काहींनी त्याची सुरुवातही केली होती.

आता हा दरवाढीचा सिलसिला थोडा मंदावणार आहे. काही काळ दरवाढ पुढे ढकलली जाईल.

कारण, सरकारने कंपन्यांना व्याजात सूट दिली आहे. कोट्यवधी रुपये त्यातून वाचणार आहेत.

काही बड्या कंपन्या नवे ग्राहक मिळवण्यासाठी इतरांपेक्षा स्वस्त पॅकेजेसही आणू शकतात. त्यामुळे ग्राहकांना फायदाच होईल.

कागदपत्रांची झंजट मिटेल

नव्या मोबाइल कनेक्शनसाठी कागदपत्रे द्यावी लागत होती. ही झंजट कदाचित येत्या काही काळात संपून जाईल.

सर्व कंपन्या डिजिटल स्वरूपातील कागदपत्रे मंजूर करतील. त्यासाठी आधारचा डेटाही वापरला जाऊ शकतो.

४०० कोटी कागदांचा डोंगर या कंपन्यांकडे साचला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे पोर्ट होताना किंवा प्रीपेडमधून पोस्टपेडमध्ये कन्व्हर्ट करतानाही कागदपत्रे द्यावी लागत होती. आता ती द्यावी लागण्याची शक्यता कमी आहे.

डिजिटल केवायसीची सुविधा आता सुरू करण्यात येणार आहे.

स्पर्धा वाढेल, किंमत पुन्हा घटेल

टेलिकॉम कंपन्यांमध्ये आता १०० टक्के एफडीआयला मंजुरी दिली आहे. त्यामुळे स्पर्धा वाढणार आहे. टेलिकॉम कंपन्यांना परदेशातून निधी जमवणे सोपे होईल. त्यामुळे गुंतवणूकदार तर मालामाल होतीलच. शिवाय, स्पर्धा वाढल्याने सेवांच्या किमतीही पुन्हा कमी होऊ शकतात.

सध्या कोणाचे किती ग्राहक?

एकूण ग्राहक- १२० कोटी

रिलायन्स जिओ- ४३.६ कोटी

भारती एअरटेल- ३५.२ कोटी

व्होडाफोन आयडिया- २७.३ कोटी

बीएसएनएल- १२.५ कोटी

एमटीएनएल- ६२.८ लाख

(जून २०२१ ची आकडेवारी)

 

(सहायक संपादक, लोकमत)

pavan.deshpande@lokmat.com