शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

शेतकरी नवरा का नको गं बाई?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 01:31 IST

कधी काळचं उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असं समाजसूत्र आता मोडीत निघालं आहे. मुलाला नोकरीच हवी, फार झाले तर व्यवसाय चालेल; पण शेती करणारा नवरा नकोच, अशी मानसिकता तयार झाली आहे. यामुळे भविष्यात सामाजिक शांतता धोक्यात येणार आहे.

ठळक मुद्दे यासाठी शेतकरी मुलगा नको, असा हेका सोडा, दृष्टी बदला, सृष्टी आपोआप बदलेली दिसेल.

- शरद यादव

कृषिप्रधान समजल्या कृषिप्रधान समजल्या जाणाऱ्या आपल्या देशात पूर्वी शेतीला प्रतिष्ठा होती. नोकरी म्हणजे दुसऱ्यांची चाकरी करणे, असा मतप्रवाह होता. काळानुसार यात बदल होत गेला व शेतीची प्रतिष्ठा कमी होत गेली. बेभरवशाचा पाऊस, शेती मालाला न मिळणारा हमीभाव, शासनाचे मनमानी धोरण यामुळे शेती करणे म्हणजे मन:स्ताप वाढवून घेणे, असा समज घट्ट होत गेला.९० च्या दशकापर्यंत शेतीची प्रतिष्ठा टिकून होती. ९२-९३ नंतर जागतिकीकरण, उदारीकरणाच्या वाºयात शेतमालाचे उत्पादन वाढले; पण हमीभावाअभावी शेतकरी कंगाल बनत गेला. याच दरम्यान, शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअरिंगचे अभ्यासक्रम शिकविणाºया संस्था वाढल्या. यातून शिकलेल्या तरुणाईला नोकºयाही मिळाल्या. महिन्याच्या ठरावीक तारखेला होणारा पगार व नोकरीची श्वाश्वती यामुळे स्थिरता येत गेली. याउलट उत्पादन जास्त झाल्याने दर पडला म्हणून शेतकरी कांदे, टोमॅटो रस्त्यावर टाकू लागला, ऊस आणि दुधाला रास्त भाव मिळावा, यासाठी रस्ते अडवू लागला. कधी महापूर, तर कधी कडक दुष्काळ असे दुष्टचक्र त्याला कीटकनाशक पिण्यास उद्युक्त करू लागले. बघता बघता ‘शेतकरी आत्महत्या’ हा चर्चासत्राचा, चिंतेचा विषय बनला. यातूनच साधारण २०१० पासून शेतकरी मुलाचे लग्न ठरणे कठीण बनल्याचे वास्तव समोर येऊ लागले आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा हे राज्यातील पाणीदार जिल्हे म्हणून ओळखले जातात. बारमाही पाण्याच्या उपलब्धतेमुळे उसाचे मळे या भागात फुलले. पण, या पट्ट्यातसुद्धा ‘शेतकरी नवरा नको’, अशी मानसिकता ठाम होऊ लागली आहे.

दहा ते पंधरा एकर शेती असणा-या शेतकरी पुत्रालाही नोकरी नाही म्हणून मुलीकडून येणारा नकार अस्वस्थ करीत आहे. यातून भविष्यात सामाजिक शांतता धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.चित्रपट, साहित्यातून रंगवले चित्र

काही चित्रपट, साहित्य यांतून शेतकरी म्हणजे अठराविश्वे दारिद्र्य, ग्रामीण ढंगात बोलणारा, घरात चुलीवर जेवण करणारा, चाबूक खांद्यावर घेऊन फिरणारा, असे चित्र निर्माण केले. या आभासी चित्राचा परिणाम मुलींच्या मानसिकतेवर झाल्याचे दिसून येते; पण आज साधनसुविधेचा झालेला विकास पाहता शेतकºयाच्या घरातही चुलीची जागा गॅसने घेतली आहे. शेतकरी युवक सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. ग्रामीण भागात वाढलेली बांधकामे पाहता खेड्यांचा तोंडवळा आता शहरी बनू लागला आहे. परिणामी शेतकºयाच्या जीवनात गुणात्मक बदल झालेला दिसतो; पण मुलींच्या डोक्यात शेतकरी म्हणजे वनवासी, असे मत पक्के बनल्याचे दिसून येते.

शेतक-याच्या मुलीला नोकरदारच हवाएखाद्या शेतकºयाला दोन मुली व एक मुलगा असेल, तर तोसुद्धा नोकरदारच जावई शोधतो. आयुष्यभर शेतात चिखल तुडविणाºयालासुद्धा शेतकरी युवक आपल्या मुलींना सुखात ठेवेल, याची खात्री वाटत नसेल तर शहरी लोकांकडून कोणती अपेक्षा करायची.

‘हम दो, हमारा एक फ्लॅट...’टीव्हीवर दररोज मालिकांची रेलचेल पाहायला मिळते. या मालिकांतून शहरातील फ्लॅटमध्ये राहणे, नोकरी करणारा नवरा, आठवड्यातून एक-दोन दिवस बाहेर जेवण, असे छानछौकी जीवन दाखविण्यात येते. याचाही परिणाम मुलींवर झालेला दिसतो. शेतकरी कुटुंबात जाणे म्हणजे एकत्र कुटुंबपद्धती आली, शिवाय स्वातंत्र्यावरही मर्यादा येणार, अशी भीती वाटत असल्याने ‘हम दो हमारा एक फ्लॅट सुनहरा’, असेच स्वप्न मुली रंगवत असल्याचे दिसते.

मुलींची संख्या कमी...मुलांची संख्या जास्त व तुलनेने कमी मुली यामुळे वधू-पित्याच्या अपेक्षा वाढल्या. नोकरी हवीच, शिवाय जोडीला थोडी शेतीही हवी. बंगला, गाडी हवी, अशा अपेक्षांची यादी वाढल्याने शेतकरीपुत्र या यादीतून बाहेर फेकला गेल्याचे चित्र दिसते.

वीर सेवा दलाचा अभिनव प्रयोगबेळगाव जिल्ह्यातील मलिकवाड येथील वीर सेवा दलाने गतवर्षी शेतकरीपुत्र वधू-वर मेळावा घेतला. याबाबत रावसाहेब कुन्नुरे म्हणाले, नोव्हेंबर २०१८ मध्ये आम्ही असा मेळावा घेतला होता. या मेळाव्यात २२ विवाह ठरले. यासाठी आम्ही ७७ गावांत बैठका घेतल्या. अशा उपक्रमाला समाजाचे पाठबळ मिळत नसल्याने आमचा हा प्रयत्न थंडावला.

शासनाच्या धोरणामुळे शेतक-याचे मरणशेतमालाला रास्त भाव मिळत नसल्याने शेतकरी पुत्राची अशी अवस्था झाल्याचे ‘स्वाभिमानी’चे नेते डॉ. जालंदर पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, ग्रामीण भागात लग्न न ठरलेल्या मुलांची संख्या वाढली आहे. शासनाने शेतीमालाला रास्त भाव देण्याचे धोरण अंगीकारले तरच हा प्रश्न सुटू शकतो.

...तर आत्महत्यांचे दृष्टचक्रगेल्या काही महिन्यांपासून वर्तमानपत्र उघडले की, आत्महत्येची बातमी नाही असे कधीच होत नाही. या समस्या भविष्यात वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

दृष्टी बदला सृष्टी बदलेलसर्वांनीच नोकरी करायची म्हटले तर आपल्याला लागणारे दोनवेळचे अन्न कोण पिकवणार, याचा विचार करावा. एकरी १०० टन ऊस पिकवणारा, एकरात ४० टन केळी घेणारा, शेतकरी युवक उद्याच्या जगाचा मूलभूत आधार असणार आहे. यासाठी शेतकरी मुलगा नको, असा हेका सोडा, दृष्टी बदला, सृष्टी आपोआप बदलेली दिसेल.

 

(लेखक, ‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीत उपसंपादक आहेत.)

 

टॅग्स :Farmerशेतकरीmarriageलग्न