‘शोध’ लिहीत असताना.
By Admin | Updated: August 8, 2015 13:07 IST2015-08-08T13:07:56+5:302015-08-08T13:07:56+5:30
कादंबरीचं स्ट्रक्चर कसं असावं? अनेक पर्याय तपासले आणि डॅन ब्राऊनचा पर्याय निवडला. कादंबरीतली पहिली घटना आणि शेवटच्या घटनेतलं अंतर कमीत कमी करायचं. मग साडेतीनशे वर्षातला घटनाक्रम दोन-तीन दिवसांत बसवायची कसरत सुरू केली. महिनाभरच्या खटपटीनंतर कथानक 72 तासांर्पयत आलं!.

‘शोध’ लिहीत असताना.
>- मुरली खैरनार
कादंबरी लिहिणं हे इतकं वेळखाऊ, अवघड आणि खर्चिक काम आहे, हे मला आधी ठाऊक नव्हतं. कुसुमाग्रज प्रतिष्ठानची अभ्यासवृत्ती मिळाली आणि ही कादंबरी लिहून काढायचं नक्की झालं. गेली वीस वर्षे हा विषय डोक्यात होता. पण एकदा काम सुरू केल्यावर दिवसभराचा सगळा वेळ त्यासाठी देऊनही प्रत्यक्ष कादंबरीचं लिखाण पूर्ण करायला मला दोन वर्षे लागली.
त्यात मला ही कादंबरी लिहायची होती, जे सामान्यपणो मराठी पुस्तके वाचत नाहीत अशा नव्या वाचकांसाठी. अशा वाचकांसाठी ज्या प्रकारचं फिक्शन लागतं तसलं फिक्शन अलीकडे मराठीत कुणी सहसा लिहीत नाही. त्यामुळे तर हे आव्हान अधिकच अवघड बनलं होतं.
तीन टप्प्यात ही कादंबरी लिहायची असं मी ठरवलं. आधी कादंबरीचं निव्वळ कथानक लिहून काढायचं. मग त्याप्रमाणो कादंबरीचा पहिला ड्राफ्ट करायचा. आणि तिस:या टप्प्यात त्यावर संस्कार करीत समाधान होईर्पयत लागतील तेवढे ड्राफ्ट करायचे.
पहिल्या टप्प्यात कथानकाच्या सा:या साडेतीनशे वर्षात घडणा:या घटना संगतवार लावून कथानक लिहायचं होतं. शिवाजी राजांच्या चरित्रतील सुरतेची लूट आणि वणी¨दडोरीची लढाई या दोन घटनांवर ही कादंबरी आधारित आहे. त्यामुळे 166क् पासून 196क् र्पयतच्या गोष्टींचा प्रवास फारसा अवघड नव्हता. कारण त्यातल्या इतिहासावर माझं आधीच काम झालं होतं. पण 196क् च्या पुढे गोष्ट बांधताना दमछाक झाली. शेवटी आजपासून 1960 र्पयत उलटं यायचं ठरवलं आणि मग गोष्ट जुळवता आली. त्यात गोंधळ एवढाच झाला की आधी जुळवलेल्या गोष्टीचे काही धागे सोडून द्यावे लागले. काही नवे धागे तयार करून ते जोडत जोडत मागे 1660 र्पयत न्यावे लागले. त्रस बराच झाला पण अखेर एक सलग कथानक तयार झालं.
दुस:या टप्प्यात प्रत्यक्ष कादंबरी लिहायची होती. कादंबरीचं स्ट्रक्चर कसं असावं याबद्दल डोक्यात द्वंद्व. कादंबरीचं कथानक ज्यात फिट बसेल अशी चार स्ट्रक्चर्स डोक्यात होती. त्यातलं एक रुट्सचं. अॅलेक्स हेली यांची ही ऐतिहासिक कादंबरी. त्यात सहाशे वर्षातल्या घटना येतात. कालानुक्रमे पहिल्या घटनेपासून सुरुवात करून त्याने ती अखेर्पयत लिहिली आहे. माङया कादंबरीतील पहिली घटना सप्टेंबर 166क् मध्ये घडते. तिथून सुरुवात करून आजर्पयत कालानुक्रमे लिहिणो हा एक पर्याय.
दुसरा पर्याय होता फ्लॅशबॅकचा. आज गोष्ट सुरू करायची आणि फ्लॅशबॅकमध्ये साडेतीनशे वर्षातल्या घटना मांडायच्या. तिसरा पर्याय तीन वेगवेगळ्या काळातल्या घटना समांतर लिहीत जाणो. 1670, 1909 व आज अशा तीन वर्षात एकेक विलक्षण घटनाक्रम येतो. प्रत्येकाला एकेक सुरुवात, एकेक मध्य आणि एकेक क्लायमॅक्स. तीन काळातल्या त्या घटना एकापाठोपाठ एक आलटून पालटून समांतर मांडीत राहायच्या. प्रत्येक प्रकरणानंतर काळ बदलीत मागे पुढे जात तीनही काळातल्या घटना एकाच वेळी आपापल्या क्लायमॅक्सला न्यायच्या.
चौथा पर्याय होता, डॅन ब्राऊनच्या कादंब:यांप्रमाणो काळ कॉम्प्रेस करायचा. डॅनच्या ‘दा ¨वची कोड’मध्ये ख्रिश्चन धर्माचा दोन हजार वर्षाचा इतिहास येतो. पण कादंबरीतली पहिली घटना आणि संपण्यापूर्वीची शेवटची घटना यातील अंतर फक्त वीस तासांचं आहे. तसं करायचं म्हणजे कादंबरी सगळी आज घडेल आणि साडेतीनशे वर्षाचा इतिहास पाश्र्वभूमीसारखा किंवा एखाद्या पात्रसारखा सतत त्या कादंबरीवर पसरलेला राहील.
मुद्दाम मग डॅन ब्राऊनच्या आणखी तीन कादंब:या तपासल्या. सगळीकडे तेच. इतिहास दोनशे वर्षाचा असो, सहाशे वर्षाचा की दोन हजार वर्षाचा, डॅन ब्राऊनच्या कादंबरीतली पहिली घटना आणि अखेरची घटना यातील अंतर फक्त 20 ते 32 तासांचं! मग म्हटले आपण डॅन ब्राऊनचेच स्ट्रक्चर वापरावे. कादंबरीतल्या सा:या घटना या फक्त छत्तीस तासांत घडल्या पाहिजेत.
मग साडेतीनशे वर्षातला घटनाक्रम घेऊन तो दोनतीन दिवसांत कोंबायची कसरत सुरू केली. प्रत्यक्ष सुरुवात केल्यावर ते किती अवघड आहे हे लक्षात आलं. महिनाभर सतत खटपट केल्यावर मला हे कथानक बहात्तर तासांर्पयत कॉम्प्रेस करता आलं. मग म्हटलं, यापेक्षा जास्त आता लगेच दाटायला नको. लिहायला घेऊ. कदाचित पहिला ड्राफ्ट झाल्यावर आपल्याला हा कालावधी कमी करून छत्तीस किंवा चोवीस तासांवर आणता येईल.
कामाला सुरुवात केल्यानंतर पहिल्या आठवडय़ातच ठरवलं की आपण जे करतोय, डोक्यात जे चाललंय त्याच्या डायरीसारख्या नोंदी ठेवाव्यात. मग डोक्यात आलं की या नोंदी फेसबुकवरही शेअर कराव्यात. आणि मग तसं करायला सुरुवात केली.
या नोंदी करण्याचे मला व्यक्तिश: खूप फायदे झाले. ज्या प्रतिक्रिया येत होत्या, त्यातून नवी माहिती, नवे लीड मिळत गेले. त्याचा उपयोग मला अभ्यासासाठी व कादंबरी लिहिण्यासाठी झाला. आपलं लिहिणं वाचकांर्पयत किती पोचू शकते, त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचाही अंदाज येत गेला. काय लिहिले तर इंटरेस्टिंग होते हेही कळत गेले. या नोंदी लिहीत गेलो तशा त्या वाचणा:यांची संख्याही वाढत गेली. फेसबुकचा मला तर उपयोग भरपूर झाला. पण ओघाओघाने या कादंबरीतही फेसबुक हे एक महत्त्वाचे पात्र बनून गेले. या सा:या काळात तीन ग्रंथालयांचा चांगलाच उपयोग करून घेता आला. नाशिकच्या सावानाचे संदर्भग्रंथालय, दुसरे धुळ्यातले राजवाडे इतिहास संशोधन मंडळ आणि तिसरे मुंबईतले एशियाटिक सोसायटीचे ग्रंथालय. एशियाटिकमधला ग्रंथसंग्रह विलक्षण तर खराच, पण हस्तलिखिते आणि नकाशे यांनी ते अधिकच समृद्ध आहे. तिथे अशोक शहाणो आणि वीरचंद धरमसी यांच्याशी अनेकदा गप्पा झाल्या. इतिहासातल्या अनेक अनवट बाबींचा तपशील मला धरमसींनी दिला. मराठीतल्या भालचंद्र नेमाडे, नंदा खरे, रत्नाकर पटवर्धन व शरद पाटील या लेखकांशी मला तपशीलवार चर्चा करायला मिळाली. त्यांच्या मताचा मला उपयोग करून घेता आला. याशिवाय इतिहासाचा अभ्यास करणा:या आणखी पंचवीसएक तज्ज्ञांची मदत झाली ती वेगळीच.
लिहिणो आणि लिहिण्याच्या सवयी या संदर्भात फ्रेडरिक फोरसिथ, डॅन ब्राऊन, जॉन ग्रिशम या लेखकांच्या अनेक मुलाखती वाचल्या. मारियो पुझोचे ‘गॉडफादर पेपर्स’ आणि सिडनी शेल्डनचे ‘द अदर साइड ऑफ मी’ मुद्दाम याच कारणासाठी वाचलं.
याच काळात टाटा लिटररी फेस्टिव्हल, टाइम्स लिटररी कार्निवल आणि जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल अशी इंग्रजीतली तीन साहित्य संमेलने मी अटेंड केली. अनेक इतिहासकार आणि सर्जनशील लेखकांना ऐकता आलं. प्रत्येकाशी व्यक्तिगत चर्चा करता आली. लेखक म्हणून आपली चौकट व्यापक करून घेण्यासाठी तर मला याचा प्रचंड उपयोग झालाच, पण माणूस म्हणून जगण्यासाठीही हे सारे लोक मला श्रीमंत करून गेले. मी ज्यांना ज्यांना ऐकले त्यातल्या प्रत्येक लेखकाच्या मतांची स्वतंत्र नोंद मी करून ठेवली. त्यावर अनेकदा मनन चिंतन करून माझी समज रुंदावली आहे.
शोध ही ऐतिहासिक कादंबरी नाही, हे आजच्या काळात घडणारे थ्रिलर आहे.
कथा आजच्या काळात घडत असली तरी त्यातल्या प्रमुख विषयवस्तू शिवाजी महाराजांच्या जीवनातील सुरतेची लूट या घटनेशी निगडित आहे. त्यामुळे गेल्या चारशे वर्षातल्या अनेक ऐतिहासिक व्यक्ती या कथेच्या ओघात कधी पात्रे म्हणून, तर कधी संदर्भ म्हणून येत राहतात. शिवाजी महाराज आणि त्यांचे वारस तर आहेतच; पण त्यांचे सहकारी, सहका:यांचे वारस, बखरकार, इतिहासकार, त्यावरून लेख, पुस्तके लिहिणारे इतिहास संशोधक, लेखक अशा अनेक प्रकारच्या ख:याखु:या ऐतिहासिक व्यक्तींचा या गोष्टीत समावेश होतो. त्यासाठी संदर्भग्रंथ वाचायला मी वीस वर्षे कष्ट घेतले होते. इतिहास हा वर्तमानापेक्षा कधीच वेगळा असत नाही. वर्तमानाच्या प्रवाहात जो इतिहास सामावू शकतो, तोच लोकमानसात टिकतो. आज ज्ञानाचे आणि कर्तृत्वाचे युग आहे. त्यामुळेच कदाचित माङया कादंबरीतला शिवाजी ज्ञानोपासक आणि महत्त्वाकांक्षी आहे. मला तसाच शिवाजी राजा इतिहासात सापडला.
गोष्टीत सतत इतिहास असला तरी ‘शोध’ ही आजच्या काळात घडणारी कादंबरी आहे. आजची माणसं, आजचा तरुण, आजचं तंत्रज्ञान यांचा वापर करीत ‘आज’चं श्रेयस धुंडाळणारी. इतिहास आणि वर्तमान यांचं एक वेगळंच मिश्रण या कादंबरीत तयार झालंय.
ते किती चांगलं उतरलंय हे या कादंबरीचे वाचक ठरवतील.
(कुसुमाग्रज प्रतिष्ठानची सर्जनशील लेखनासाठीची पहिली अभ्यासवृत्तीप्राप्त लेखक.)
murli2999@gmail.com