शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

अमिताभ बच्चन जेव्हा ‘ऋणा’बद्दल बोलतात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 8:00 AM

अजूनही मला कामे मिळतात, हे नशीबच!‘आता थांबा’ असे रसिक जेव्हा म्हणतील, तेव्हाच मी थांबेन!!

ठळक मुद्देसिम्बॉयोसिस अभिमत विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव रंगला. अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर या महोत्सवाला उपस्थित होते. त्यांच्या दिलखुलास गप्पांचा हा संपादित अंश

- अमिताभ बच्चन

‘मी’ विशाखापटणमला गेलो असताना वृत्तपत्रात एक सुन्न करणारी बातमी वाचली. अवघ्या दहा हजार रुपयांचे कर्ज फेडता न आलेल्या शेतकर्‍याने आत्महत्या केल्याचे वाचून अक्षरश: हेलावून गेलो. जणू माझा भूतकाळच डोळ्यासमोर तरळला. कर्जबाजारी होणं काय असतं, तो आयुष्यातील किती कठीण काळ असतो, हे जवळून अनुभवलं आहे. त्या प्रसंगानंतर एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सावकारी पाशात अडकलेल्या 400पेक्षा अधिक शेतकर्‍यांना कर्जमुक्त केले आणि आत्महत्येपासून परावृत्त करू शकलो याचे समाधान वाटते. कोरोनाच्या काळातही 5 हजार व्यक्तींच्या दोन वेळच्या भोजनाची सोय केली. अनेकांना विमान, बसने गावी पाठवले. माझ्यासारख्याच भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी एकत्र येऊन पडद्यामागच्या सुमारे एक लाखांना मदत केली. कुणाला मदत केल्यानंतर त्याची प्रसिद्धी करता कामा नये असं म्हणतात. ज्यात चुकीचं काहीच नाही. परंतु कलाकारांना सामान्य माणसाच्या आयुष्याशी काही देणेघेणे नसते हा समज चुकीचा आहे. भारतीय चित्रपट क्षेत्रातील बहुतांश कलाकार आपापल्या परीने सामाजिक बांधिलकी जपत असतात. मात्र त्याची फारशी चर्चा करत नाहीत. एवढंच हे सांगण्याचा यामागील हेतू आहे. त्या व्यक्तीला न ओळखता त्याच्याविषयी मतप्रदर्शन करणं योग्य नाही.

 

इतरांप्रमाणे माझ्या आयुष्यातदेखील अनेक चढउतार आले. चित्रपटसृष्टीमध्ये येण्याआधी नोकरी मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. आकाशवाणी केंद्रामध्ये निवेदकाच्या नोकरीसाठी गेलो असताना केवळ आवाजामुळे नकार ऐकावा लागला. पदवी मिळाल्यानंतरही नोकरी मिळत नसल्यामुळे खूप नैराश्यात गेलो होतो. तेव्हा बाबूजींपाशी जाऊन ‘आपने हमे पैदा क्यू किया?’ असा प्रश्न त्यांना विचारला होता. दुसर्‍या दिवशी पहाटे 4 वाजता फिरायला जाताना त्यांनी माझ्या उशापाशी एक पत्र ठेवले. त्यात लिहिले होते ‘मेरे पास इसका जबाब नहीं है, पर ये सवाल मैने मेरे पिताजी, पिताजी ने उनके पिताजी को भी नही पूंछा होगा. पर तुम अपने बेटेको पूंछ कर पैदा करना’ त्यानंतर आयुष्यात कधीच हार मानायची नाही. हे मनाशी पक्के ठरवले. प्रत्येक कठीण गोष्टींचा धीराने सामना केला. स्वत:मध्ये सुधारणा करत राहिलो. आजही नवीन चित्रपट किंवा प्रोजेक्ट्सवर काम करताना ते यशस्वी होतील की नाही याची चिंता असतेच. पण कुणी काही बोलले तरी कायम कामावरच लक्ष केंद्रित केले. वयानुरूप मला आजही काम मिळत आहे. जेव्हा काम मिळणे बंद होईल तेव्हाचं थांबेन. जोपर्यंत काम मिळत राहील आणि रसिक थांबा म्हणणार नाहीत तोपर्यंत मी काम करतच राहीन. इतकी वर्षे उलटली तरी आजही प्रेक्षकांना ‘चित्रपट’ हे इतके प्रभावी माध्यम का वाटते, तर चित्रपटाच्या तीन तासाच्या कथेमधून विषयाला चटकन न्याय मिळतो. जे वास्तव जीवनात मिळवायला कदाचित वर्ष लोटतात. ‘पिंक’ चित्रपटातला ‘नो’ हा शब्द समाजात किती महत्त्वपूर्ण आहे. त्यामागची ताकद अनेकांना माहिती नव्हती. ती एका कथेतून कळली. ‘ब्लॅक’ चित्रपटातला शिक्षक जेव्हा दिव्यांग विद्यार्थिनीला तू हे करू शकतेस याबाबत प्रोत्साहन देतो, तेव्हा त्या मुलीच्या आयुष्यात घडलेला बदल अनेकांना नि:शब्द करून जातो. कथेतून मांडलेले हे प्रभावी विषय खूप बदल घडवून जातात. कोणतीही प्रतिमा मग ती ‘अँग्री यंग मॅन’ची का असेना समाजातूनच निर्माण होत असते. कारण सामान्य व्यक्तींच्या अन्यायाला वाचा फोडणारा असा कुणीतरी व्यक्ती हवा असतो आणि त्याला घडविण्यात दिग्दर्शकाचा वाटा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. फक्त पडद्यावर ती भूमिका अभिनेता साकारतो. त्यामुळे त्याला र्शेय मिळते. माझ्यावरदेखील रसिकांनी उदंड प्रेम केले आणि करीत आहेत. कुटुंबाचा पाठिंबा आणि रसिकांच्या प्रेमामुळेच भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये इतकी वर्षे टिकून राहू शकलो. कोरोनाची लागण झाल्यानंतरही सर्वांनी दाखविलेला विश्वास आणि डॉक्टर व नर्सच्या उत्तम कामगिरीमुळे कोरोनातून सहीसलामत बाहेर पडलो. आज कोरोनाकाळात स्वत:ची आणि कुटुंबाच्या जिवाची पर्वा न करता हे कोरोनायोद्धे करीत असलेले काम खरंच प्रशंसनीय आहे. देवळात देव शोधू नका. तो अनुभवायचा असेल तर रुग्णालयात जा. तिथे डॉक्टर आणि परिचारिकेच्या रूपात खरे देवदूत मिळतील. त्यांचे ऋण हे न फेडता येण्यासारखेच आहेत. विद्यार्थ्यांना एकच सांगू इच्छितो की, शिक्षकांचे आयुष्यातील स्थान हे पाठीच्या कण्यासारखे असते. ते आपल्याला आयुष्यात उभे राहायला शिकवतात. त्यामुळे त्यांचा कायम आदर करा व त्यांचे कायम ऋणी राहा. आयुष्यातील कोणत्याही कठीण प्रसंगात मग तो कोरोना असो किंवा अजून काही, शिक्षक हेच आपले सदैव मार्गदर्शक असतात हे विसरू नका! एखाद्या दिशेने मार्गक्रमण करताना जर प्रगती थांबली किंवा अडथळे आले तर रस्ता बदला; पण मार्गक्रमण करणे सोडू नका.

------------------------------------------------------------------------------

लोकशाहीचा पाचवा स्तंभ

काही वर्षांपूर्वी मला सोशल मीडियावर सक्रिय होण्याचा सल्ला मिळाला. मी स्वत:चा एक छोटा ब्लॉग लिहिला. त्याला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ट्विटर, इन्स्ट्राग्रामसारख्या मीडियाला हळूहळू आत्मसात केले. आज हीदेखील माझी एक फॅमिली झाली आहे. कुणी एकमेकांना भेटत नाही; पण लेखनातून एकमेकांचा स्वभाव जाणतो. ट्विटर, फेसबुक हे आता रूटीन झाले आहे. यापुढील काळात सोशल मीडियाला लोकशाहीचा पाचवा स्तंभ म्हणायला हरकत नाही.

-शब्दांकन : नम्रता फडणीस