शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
2
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
3
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
4
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
5
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
6
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
7
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
8
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
9
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
10
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
11
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
12
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
13
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
15
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
16
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
17
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
18
पाकला पाठिंबा देणं तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या अंगलट! भारताने थेट वर्मावरच घातला घाव
19
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
20
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना

पाश्चिमात्य पाहुण्यांची नजर.

By admin | Updated: January 23, 2016 14:53 IST

नेआर्खस, मेगॅस्थेनिस, अल बैरूनी, इब्न-बतूता, अब्दुर्रझाक अल समरकंदी. अशा कितीतरी परदेशी प्रवाशांनी भारताविषयी चांगलं-वाईट, बरंच काही लिहून ठेवलं आहे. आपल्याच घरातल्या अडगळीकडे आपण सरावानं काणाडोळा करतो, पण परक्या पाहुण्यांची न सरावलेली नजर मात्र सा:या दुर्लक्षित गोष्टींची दखल घेते.

- डॉ. उज्ज्वला दळवी
 
'हावरटासारखी जगभरची जमीन बळकावून शेवटी तूही गजभर जमिनीतच सामावणार आहेस!’’
- जगज्जेत्या शिकंदराला हिमालयातल्या नि:संग साधूंनी ठणकावून सांगितलं आणि शिकंदराच्याच एका विश्वासू दूताने, नेआर्खसने ते प्रामाणिकपणो लिहूनही ठेवलं. 
तेवीसशे वर्षांपूर्वी शिकंदराने नेआर्खसला सिंधू नदीच्या मुखापासून इराणच्या आखातापर्यंतच्या सागरीमार्गाची माहिती काढायला पाठवलं. नेआर्खसने इमानेइतबारे तो प्रवास केला आणि तो अनुभव लिहून काढला. शिकंदराने राजा पोरसाचा केलेला सन्मानही त्या लिखाणामुळेच जगाला समजला. ‘न्यायप्रिय हिंदुस्थानी दुस:यांवर 
आक्र मण करून त्यांची मायभूमी हिसकून घेत नाहीत. मृत्यूनंतर ते सज्जन ‘कीर्तिरूपे उरत’ असल्यामुळे हिंदुस्थानात दगडमातीची स्मारकं उभारत नाहीत,’ असंही निरीक्षण नेआर्खसने कौतुकाने नोंदलं. 
चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारातल्या मेगॅस्थेनिस या ग्रीक राजदूताने आपल्या ‘इंडिका’ नावाच्या शब्दांकनात नेआर्खसच्या अहवालाचा आधार घेतला. त्यात त्याने कारागीर, कामगारांवरचे निरीक्षक, शेतसारा वसुली करणारे अधिकारी धरून हिंदुस्थानी समाजरचनेतल्या सात जातींचं वर्णन केलं. परकीय हल्ल्यात शेतक:याच्या केसाला किंवा कणसालाही कुणी धक्का लावत नाही हे आवर्जून सांगितलं. त्या दोन्ही लिखाणांचा बराचसा भाग शतकांच्या पाचोळ्याखाली हरवला. पण अॅथेन्समधल्या अॅरियन नावाच्या इतिहासकाराने चारशे वर्षांनंतर त्यांच्यातल्या मजकुराच्या आधारे लिहिलेलं ‘इंडिका’ याच नावाचं पुस्तक अजून उपलब्ध आहे. त्याच्यात शिकंदराच्या काळातल्या सुवर्णभूमी-हिंदुस्थानाच्या इतिहास-भूगोल-संस्कृतीबद्दल सविस्तर तळटीपाही आहेत.  
त्याच काळातल्या एका निनावी ग्रीक खलाशाने त्यावेळच्या बंदरांची, रोमबरोबरच्या व्यापाराची आणि त्या प्रवासातल्या धोक्यांची कल्पना देणारं, ह्यढी1्रस्र’42 ा 3ँी ए183ँ1्रंल्ल रीं नावाचं प्रवासवर्णन लिहिलं. सहाव्या शतकातला ह्यूएनत्संगही हिंदुस्थानच्या श्रीमंतीने आणि ज्ञानी हिंदुस्थान्यांच्या चांगुलपणाने भारावला होता. अल बैरूनी हा दहाव्या शतकातल्या उझबेकिस्तानातला कुशाग्र बुद्धीचा अनाथ मुलगा. 
राजाश्रयामुळे त्याला उत्तम शिक्षण लाभलं. पण त्याच्या बाविसाव्या वर्षी इस्लामी जगात संघर्षाची वादळं उठली. युद्धांचा ससेमिरा चुकवत तो जीव घेऊन एका राजाकडून दुस:याकडे भटकत राहिला. शेवटी गझनीच्या महमूदाने त्याला आपल्या पदरी वेठीलाच धरला. हिंदुस्थानावर केलेल्या सगळ्या विध्वंसक हल्ल्यांमध्ये महमूदाने शांत, अभ्यासू वृत्तीच्या बैरूनीला सक्तीने बरोबर नेलं. महमूदाच्या हैदोसामुळे मुसलमानांबद्दल लोकांच्या मनात तेढ होती. भाषेचीही अडचण मोठी होती. पण महमूदाने पंजाब जिंकल्यावर बैरूनीने तिथल्या माणसांशी संवाद साधला. चिकाटीने संस्कृत शिकून त्याने त्या भाषेतल्या ग्रंथांचा आणि सरसकट उत्तर हिंदुस्थानाचाही अभ्यास केला, अनेक संस्कृत ग्रंथांचं अरबीत भाषांतर केलं.
व्यासंगी संशोधक अल बैरूनी
अष्टपैलू बैरूनीने विविध शास्त्रंवरची एकूण 146 व्यासंगपूर्ण पुस्तकं लिहिली. ‘किताब अल हिंद’ हे त्याचं सर्वाधिक गाजलेलं, सोप्या अरबीत लिहिलेलं, ऐंशी प्रकरणांचं पुस्तक. प्रत्येक प्रकरणाच्या सुरु वातीला एक प्रश्न, मग वर्णनविस्तार आणि समारोपाला इतर संस्कृतींशी तुलना, या पद्धतीने त्याने हिंदुस्थानी लोकांनी केलेल्या अनेक विधानांची शहानिशा केली आहे. धर्म-सण-मूर्तिपूजा, न्याय-तत्त्वज्ञान-साहित्य, खगोलशास्त्र-रासायनिक किमया,  समाजसंस्था-रीतिरिवाज, वजनं-मापं अशा अनेक विषयांवरची माहिती त्यात आहे. हिंदू वर्णसंस्थेची पर्शियातल्या चातुर्वण्याशी तुलना करून फक्त त्यातल्या सोवळ्या-ओवळ्यावर टीका केली आहे. पृथ्वीचं भ्रमण, गुरु त्वाकर्षण, ग्रहणं वगैरेंबद्दल आर्यभटाने केलेल्या शास्त्रोक्त चर्चेबद्दलचा ऊहापोहदेखील अल बैरूनीच्या बखरीत सापडतो. ‘आर्यभटाची तर्कसुसंगत वैज्ञानिक विचारपद्धती लोपून पूर्वजांच्या मातब्बरीची शेखी मिरवायची, परक्यांना आणि नव्या विचारांना तुच्छ लेखायची बुरसटलेली मनोवृत्ती हिंदुस्थानात वाढीला लागली आहे,’ असं त्याने परखडपणो नमूद केलं आहे. 
इब्न-बतूताची भटकंती
इब्न-बतूता हा चौदाव्या शतकातला मोरोक्कन यात्रेकरू. जेरु सलेमवाटे मक्के-मदिनेला पोचेपर्यंत त्याला प्रवासाची ङिांग चढली. तिथून परत मोरोक्कोला न जाता पुढच्या वीस वर्षांत तो पंचाहत्तर हजार मैल भटकला! त्या सगळ्या प्रवासाची त्याने तपशीलवार रोजनिशी ठेवली. वाटेतली शहरं, नद्या, मशिदी, धर्मशाळा, माणसं, प्राणी, झाडं वगैरेंची वर्णनं केली. ठिकठिकाणी घडलेले किस्सेही नोंदून ठेवले. काफल्यावर हल्ला होऊन बहुतेक सहप्रवासी मरणं, गंभीर जखमा होणं, सगळी चीजवस्तू लुटली जाणं, जहाज फुटून भलत्याच किना:याला लागणं, एकलेपणाने औदासीन्य येणं हे सारं त्यानं सोसलं. इराण-इराक, येमेन-ओमान-बाहरेन, अरेबिया, तुर्कस्तान, क्र ीमिया, मध्य आशिया फिरून तो हिंदुस्थानात आला. 
सुलतान महंमद तुघलकाने त्याला दिल्लीचा काझी बनवलं. चौदा विद्या आणि चौसष्ट कला अवगत असलेला शीघ्रमती, उदार महंमद विक्षिप्त, लहरी आणि निर्दय होता. त्याच्या दारात दानधर्माने तृप्त झालेल्या याचकांची रीघ आणि शिरकाण केलेल्या प्रेतांचे ढीग असत. त्या सुलतानाची खप्पामर्जी झाल्यामुळे काही दिवस इब्न-बतूतालाही तुरु ंगात खितपत पडावं लागलं. त्याच्या मित्रला सुलतानाने हाल हाल करून ठार मारलं. त्याने जिवाच्या आकांताने देवाची आण भाकली. काही दिवसांनी सुलतानी लहर फिरली आणि  इब्न-बतूताची राजदूत म्हणून चीनला रवानगी झाली. 
पंधराव्या शतकात अब्दुर्रझाक अल समरकंदी हा बखरकार पर्शियन राजदूत म्हणून कालिकतमध्ये आला होता. त्याने कालिकतची संस्कृती, विजयनगर साम्राज्याचं वैभव, तिथल्या दरबारातला न्यायदाता तृतीयपंथी अधिकारी वगैरेंचं वर्णन केलं. सोळाव्या शतकातल्या अबुल फझलने अकबराची महसूल पद्धत बारकाईने नमूद केली.
सतराव्या शतकात निकोलाओ मानुच्ची हा इटालियन प्रवासी मोगलांच्या पदरी होता. त्याने मोगल दरबाराचं तपशीलवार वर्णन लिहून ठेवलं. पण तज्ज्ञांना ते विश्वसनीय वाटत नाही. त्याच काळात फ्रान्स्वा बर्नियर या फ्रेंच डॉक्टरने हिंदुस्थानात बराच प्रवास केला. मोगलांचे सरकारी अधिकारी जमिनीच्या मशागतीतून नफा ओरपून घेतात आणि तिची निगा राखत नाहीत. कारागिरांचा नफा सरकारजमा होत असल्यामुळे उत्पादनाला प्रोत्साहन मिळत नाही, अशी मतं बर्नियरने मांडली. ती सर्वस्वी बिनचूक नव्हती. पण त्यामुळे युरोपियनांचं हिंदुस्थानबद्दलचं मत कलुषित झालं. हिंदुस्थानचा दूर पल्ल्याचा व्यापार, श्रेष्ठींचं उत्तम व्यवस्थापन, त्यांचे प्रस्थापित परस्परसंबंध आणि हिंदुस्थानातल्या स्त्रियांना उद्योगधंद्यात, व्यापारउदीमात असलेलं स्वातंत्र्य यांचं मात्र बर्नियरला कौतुक वाटलं. 
त्या परदेशी पाहुण्यांच्या लिखाणामुळे पूर्वीच्या हिंदुस्थानाची कल्पना येतेच पण एक वेगळा दृष्टिकोनही मिळतो. आपल्याच घरातल्या कोन्याकोप:यांकडे, अडगळ-धुळीकडे आपण सरावाने काणाडोळा करतो. परक्या पाहुण्याची न सरावलेली नजर त्या सगळ्या दुर्लक्षित गोष्टींची दखल घेते. परदेशी प्रवाशांच्या नजरेतून पाहता भारताच्या इतिहासाची तशी नवी जाण येते. चुका कळतात. खरं शिक्षण होतं. त्यांच्या देशाटनाने आपल्याला चातुर्य लाभतं.
 
विडय़ाची चार पानं.
इब्न-बतूतानं आपल्या ‘अल रिहला’ या पुस्तकात सुलतानाच्या सनसनाटी किश्श्यांशिवाय हिंदुस्थानातला गुलामांचा बाजार, घोडय़ांच्या बाजारावरचा कर आणि त्यातला फायदा, हिंदुस्थानाचे व्यापारमार्ग, टपाल खातं आणि वैभवशाली बाजार याबद्दलही लिहिलं आहे. सोन्यानाण्याऐवजी विडय़ाची चार पानं दिल्यानेही हिंदुस्थानी लोकांचा सन्मान होतो, डोळे, केस असलेल्या, मुंडक्यासारख्या दिसणा:या नारळापासून दूध, मध आणि तेल या तिन्ही गोष्टी बनतात असं तो नवलाईने सांगतो. नीरा आटवून बनवलेलं मधासारखं घाटलं त्याला आवडत असे.
 
लेखिका गेली तीस वर्षे सौदी अरेबिया 
आणि त्याआधी इंग्लंडमध्ये वास्तव्याला होत्या. ‘मानवाचा प्रवास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.
ujjwalahd9@gmail.com